Matheesha Pathirana Hand Injury : आता आयपीएल २०२४ सुरू होण्यास सात दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. २२ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यातील सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला मोठा फटका बसणार असल्याचे दिसत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मथीशा पाथिराना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे चार ते पाच आठवडे बाहेर राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

६ मार्च रोजी बांगलादेश विरुद्ध सिल्हेत येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान पाथिरानाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याने स्पेल पूर्ण न करताच मैदान सोडले होते. या दुखापतीपासून पाथिराना क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएल २०२३ मध्ये त्याने १२ सामन्यात १९ विकेट घेत चेन्नई सुपर किंग्जच्या विजेतेपदात पाथिरानाने मोठी भूमिका बजावली होती.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, मथीशा पाथिरानाच्या दुखापतीबाबत आयपीएलच्या एका सूत्राने सांगितले की, पथिराना पहिल्या काही सामन्यांसाठी उपलब्ध असेल की नाही हे आत्ताच सांगणे कठीण आहे. आयपीएलच्या सूत्राने सांगितले की, “ग्रेड १ हॅमस्ट्रिंग पूर्णपणे बरे होण्यासाठी साधारणपणे दोन आठवडे लागतात. त्यामुळे, पाथिराना संघात कधी सामील होऊ शकतो हे पाहणे बाकी आहे. तसेच या टप्प्यावर तो पहिल्या काही सामन्यांसाठी उपलब्ध होईल की नाही हे सांगणे कठीण आहे.”

हेही वाचा – Ravichandran Ashwin : ‘मी आयुष्यभर धोनीचा ऋणी राहीन’, १३ वर्षे जुनी घटना आठवून अश्विन झाला भावुक

आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे अंगठ्याच्या शस्त्रक्रियेनंतर स्पर्धेच्या किमान पहिल्या भागातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंडच्या तिसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान कॉनवेच्या बोटाला दुखापत झाली होती. चेन्नई सुपर किंग्स २२ मार्च रोजी चेपॉक येथे आयपीएल २०२४ च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.

हेही वाचा – IPL 2024: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, ‘हा’ स्टार वेगवान गोलंदाज सुरूवातीच्या सामन्यांमधून बाहेर

आयपीएल २०२४ साठी सीएसकेचा संपूर्ण संघ :

एमएस धोनी (कर्णधार), मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगेरकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पाथिराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महेश तिक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरावली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Csk pacer mathisha pathira has been ruled out for the first few weeks of ipl 2024 due to a hand injury vbm
First published on: 17-03-2024 at 15:53 IST