CWG 2022 India Vs Barbados T20 Cricket Match Updates in Marathi: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने बार्बाडोसचा १०० धावांनी पराभव केला. स्पर्धेतील दुसऱ्या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. बार्बाडोसची कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. निर्धारित २० षटकांमध्ये भारताने चार बाद १६२ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बार्बाडोसला २० षटकांमध्ये आठ बाद ६२ धावा करता आल्या. पदकाची आशा टिकवून ठेवण्यासाठी आजचा सामना हरमनप्रीतच्या संघासाठी महत्त्वाचा होता.

ipl 2024 lucknow fans have a special demand from dhoni-photos of the banner are goes viral before the ipl match
PHOTO : धोनीकडे चाहत्यांची खास मागणी; चौका-चौकात लावले बॅनर; म्हणाले, “सामना जिंकण्यासाठी जेव्हा १२ रन…”,
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Highlights Score in Marathi
IPL 2024 MI vs RCB Highlights : बुमराहचा टिच्चून मारा, इशान-सूर्याची धडाकेबाज फलंदाजी, मुंबईचा आरसीबीवर एकहाती विजय
sourav ganguly
पंत तंदुरुस्त, पण सिद्ध करण्यासाठी वेळ हवा – गांगुली
Viral Video student got up from her seat to submit the paper Fan Falls On Seat watch ones
VIDEO: धक्कादायक! तरुणीच्या बाकावर कोसळला फिरता पंखा अन्… दृश्यं CCTV कॅमेऱ्यात कैद
Live Updates

Commonwealth Games 2022 Day 1 Updates, India W Vs Barbados W T20 Live: भारत विरुद्ध बार्बाडोस महिला टी ट्वेंटी सामन्याचे सर्व अपडेट्स

01:14 (IST) 4 Aug 2022
बार्बाडोसचा डाव गडगडला

बार्बाडोसचा सहावा गडी बाद झाला आहे. संघाची अवस्था सहा बाद ४५ अशी झाली आहे.

00:56 (IST) 4 Aug 2022
बार्बाडोसचा पाचवा गडी तंबूत

स्नेह राणाने बार्बाडोसचा पाचवा गडी तंबूत पाठवला आहे. किशोना नाइट १६ धावा करून बाद झाली.

00:29 (IST) 4 Aug 2022
कर्णधार हेली मॅथ्यूज बाद

कर्णधार हेली मॅथ्यूजच्या रुपात बार्बाडोसचा दुसरा गडी बाद झाला आहे.

00:21 (IST) 4 Aug 2022
बार्बाडोसला पहिला धक्का

रेणूका ठाकूर बार्बाडोसला पहिला धक्का दिला आहे. डिआंड्रा डॉटिन शून्यावर माघारी परतली आहे.

00:20 (IST) 4 Aug 2022
बार्बाडोसच्या डावाला सुरुवात

बार्बाडोसच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे. सलामीवीर मैदानात उतरले आहेत.

00:10 (IST) 4 Aug 2022
जेमिमाह रॉड्रिग्जचे शानदार अर्धशतक

जेमिमाह रॉड्रिग्जने शानदार अर्धशतक झळकावले. हे तिच्या आंतरराष्ट्रीय टी २० कारकिर्दीतील सातवे अर्धशतक ठरले.

23:32 (IST) 3 Aug 2022
भारताचा चौथा गडी बाद

तानिया भाटियाच्या रुपात भारताचा चौथा गडी बाद झाला आहे. भारताच्या १३ षटकांमध्ये चार बाद ९३ धावा झाल्या आहेत.

23:18 (IST) 3 Aug 2022
कर्णधार हरमनप्रीत कौर शून्यावर बाद

कर्णधार हरमनप्रीत कौरच्या रुपात भारताचा तिसरा गडी बाद झाला आहे. हरमनप्रीतला खातेही उघडता आले नाही.

23:14 (IST) 3 Aug 2022
शफालीचे अर्धशतक हुकले

सलामीवीर शफाली वर्माचे अर्धशतक हुकले. तिने २६ चेंडूंत ४३ धावा फटकावल्या.

23:09 (IST) 3 Aug 2022
आठ षटकांमध्ये भारताच्या एकबाद ६७ धावा

आठ षटकांमध्ये भारताच्या एकबाद ६७ धावा झाल्या आहेत. शफाली वर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्जमध्ये ५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली आहे.

23:00 (IST) 3 Aug 2022
भारताचे अर्धशतक पूर्ण

सहाव्या षटकामध्ये भारताचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. शफाली वर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्जने फटकेबाजी करत आहेत.

22:51 (IST) 3 Aug 2022
चार षटकांमध्ये भारताच्या एकबाद ३८ धावा

चार षटकांमध्ये भारताच्या एकबाद ३८ धावा झाल्या आहेत. शफाली वर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्जने फटकेबाजी सुरू केली आहे.

22:40 (IST) 3 Aug 2022
स्मृती मंधानाच्या रुपात भारताचा पहिला गडी बाद

स्मृती मंधानाच्या रुपात भारताचा पहिला गडी बाद झाला आहे. तिने पाच धावा केल्या. भारताच्या १.२ षटकांमध्ये एक बाद ८ धावा झाल्या आहेत.

22:28 (IST) 3 Aug 2022
भारताची फलंदाजी सुरू

भारताच्या फलंदाजी सुरुवात झाली आहे. सलामीवीर स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा मैदानात उतरल्या आहेत.

22:21 (IST) 3 Aug 2022
असा असेल बार्बाडोस महिला संघ

बार्बाडोस महिला संघ: डिआंड्रा डॉटिन, हेली मॅथ्यूज (कर्णधार), केसिया नाइट (यष्टीरक्षक), आलिया अॅलेन, किशोना नाइट, ट्रिशन होल्डर, अलिसा स्कँटलबरी, शकेरा सेलमन, शमिलिया कोनेल, शनिका ब्रुस, शाँट कॅरिंग्टन.

22:15 (IST) 3 Aug 2022
पूजा वस्त्राकरचे संघात पुनरागमन

भारतीय महिला संघ: शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, राधा यादव, स्नेह राणा, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, तानिया भाटिया

22:04 (IST) 3 Aug 2022
नाणेफेक जिंकून बार्बाडोसचा गोलंदाजीचा निर्णय

बार्बाडोसची कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.