विराट कोहलीला प्रपोज करणारी इंग्लंडची क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरसोबत गेली लंच डेटवर!

डॅनियल वॅट आणि अर्जुन खूप दिवसांपासून एकमेकांचे मित्र आहेत.

Danielle Wyatt
फोटो सौजन्य – डॅनियल वॅट इन्स्टाग्राम

इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटू भारतीय पुरुष खेळाडूंच्या विशेष प्रेमात आहेत, ही बाब आतापर्यंत अनेकदा उघड झाली आहे. सारा टेलरपासून ते कॅथरिन ब्रँटपर्यंत, अनेक महिला क्रिकेटपटू भारतीय खेळाडूंच्या चाहत्या आहेत. इंग्लंडची एक महिला खेळाडू तर चक्क मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलासोबत लंच डेटवर गेली आहे. डॅनियल वॅट आणि अर्जुन तेंडुलकर नुकतेच लंच डेवर गेले होते. डॅनियनलने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला अर्जुनचा फोटो शेअर केला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या रणजी करंडक स्पर्धेमध्ये अर्जुनला मुंबईच्या संघात स्थान मिळालेले नव्हेत. त्यामुळे तो इंग्लंडमध्ये सुट्टी घालवत आहे. तिथे अर्जुन इंग्लंडची महिला क्रिकेटर डॅनियल वॅटसोबत लंच डेटवर गेला होता. डॅनियल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अर्जुनचा फोटो टाकला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज असलेला अर्जुन रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आनंद घेताना दिसत आहे. डॅनियलची ही इन्स्टाग्राम स्टोरी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली.

डॅनिलयलने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला अर्जुनचा फोटो शेअर केला आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

डॅनियल वॅट ही तिच खेळाडू आहे जिने २०१४ मध्ये विराट कोहलीला ट्वीटरवर प्रपोज केले होते. तिच्या ट्वीटमुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली होती.

डॅनियल वॅट आणि अर्जुन खूप दिवसांपासून एकमेकांचे मित्र आहेत. दोघेही एकमेकांचे कौतुक करत असतात. डॅनियल ही अर्जुनच्या गोलंदाजीची चाहती आहे. २०२० मध्ये तिने जाहिरपणे अर्जुनच्या गोलंदाजीचे कौतुक केले होते. ३१ वर्षीय डॅनियल वॅट इंग्लंडची तारांकित खेळाडू आहे. तिने इंग्लंडकडून ९३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यात तिने सुमारे १ हजार ५०० धावा केल्या आहेत आणि २७ बळी मिळवले आहेत. १२४ टी २० सामन्यांमध्ये तिने जवळपास दोन हजार धावा आणि ४६ बळी मिळवले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: English female cricketer danielle wyatt and arjun tendulkar went on a lunch date vkk

Next Story
India Tour Of New Zealand : टी २० विश्वचषकानंतर भारत करणार न्यूझीलंड दौरा, किवी क्रिकेट मंडळाने जाहीर केले तपशील
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी