ग्रेन्क क्लासिक बुद्धिबळ : आनंदची अ‍ॅडम्सशी बरोबरी

भारताचा विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंद याने ग्रेन्क क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेतील पहिल्या फेरीत मायकेल अ‍ॅडम्स या ब्रिटिश खेळाडूविरुद्ध बरोबरी स्वीकारली. सहा खेळाडूंच्या या स्पर्धेत इटलीच्या फॅबिआनो कारुआना याने पहिल्या फेरीत एक गुणासह आघाडी घेतली आहे. त्याने जर्मनीच्या जॉर्ज मेईर याच्यावर

भारताचा विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंद याने ग्रेन्क क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेतील पहिल्या फेरीत मायकेल अ‍ॅडम्स या ब्रिटिश खेळाडूविरुद्ध बरोबरी स्वीकारली. सहा खेळाडूंच्या या स्पर्धेत इटलीच्या फॅबिआनो कारुआना याने पहिल्या फेरीत एक गुणासह आघाडी घेतली आहे. त्याने जर्मनीच्या जॉर्ज मेईर याच्यावर शानदार विजय मिळविला. अर्कादजी नैदितिश व डॅनियल फ्रिडमन या दोन्ही जर्मन खेळाडूंमधील डाव बरोबरीत राहिला. आनंद, नैदितिश, फ्रिडमन व अ‍ॅडम्स यांचा प्रत्येकी अर्धा गुण झाला आहे. आनंदने अनुभवी अ‍ॅडम्सविरुद्ध कल्पकतेने खेळ केला. काळ्या मोहरांच्या साहाय्याने खेळणाऱ्या आनंदने १६व्या चालीला हत्तीची अनपेक्षित चाल करीत अ‍ॅडम्सला संभ्रमात टाकले. त्यामुळे अ‍ॅडम्सला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे मोहरे घेतले. डावातील गुंतागुंत वाढल्यामुळे दोन्ही खेळाडूंनी ४३ व्या चालीस डाव अनिर्णित ठेवला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Greak classic chess level by anand with adems

ताज्या बातम्या