भारताचा दिग्गज क्रिकेटर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) त्याच्या मनातील ऑल टाईम टी20 इलेवनची घोषणा केलीय. त्याने आपल्या या संघात वेस्टइंडीजच्या ४ खेळाडूंचा समावेश केलाय. यानंतर हरभजनने ३ भारतीय खेळाडूंना या संघात स्थान दिलंय. याशिवाय इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकाच्या प्रत्येकी एका खेळाडूचा या यादीत समावेश आहे. विशेष म्हणजे हरभजनने भारताचा माजी कर्णधार एम. एस. धोनीला (MS Dhoni) या टीमचा कर्णधार नियुक्त केलंय.

स्पोर्ट्सकीडा या यू-ट्यूब चॅनलवर बोलताना हरभजन सिंगने आपली ऑल टाईम टी20 इलेवनची घोषणा केली. त्याने रोहित शर्मा आणि ख्रिस गेल या दोघांना सलामीवीर फलंदाज म्हणून निवडलंय. यानंतर जोस बटलरला तिसऱ्या क्रमांकावर घेतलं. हरभजन सिंग बटलरला खूप विश्वासार्ह खेळाडू मानतो. एकदा सेट झाल्यावर तो चांगली कामगिरी करतो असंही हरभजनने नमूद केलंय.

माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनचाही समावेश

हरभजनने या संघात ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनचाही समावेश केला. वॉटसन या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. वॉटसन एक चांगला सलामीवीर असतानाही त्याला या संघात चौथ्या क्रमांकावर ठेवलं आहे. हरभजन आणि शेन वॉटसन दोघे 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्स टीमचा भाग होते.

“धोनी ऑल टाईम टी२० इलेवन संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षकही”

रॉयल चैलेंजर्स बंगलोर आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटर एबी डीविलियर्सला हरभजन सिंगने आपल्या संघात पाचव्या क्रमांकावर घेतलंय. यानंतर एम. एस. धोनीचा क्रमांक लागतो. हरभजनने धोनीला या संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षकही बनवलं आहे. हरभजनने अष्टपैलू खेळाडू म्हणून किरोन पोलार्ड आणि ड्वेन ब्रावोची निवड केलीय. गोलंदाज म्हणून सुनील नारेन, लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराहचा समावेश केलाय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरभजन सिंगची ऑल टाईम टी२० इलेवन

रोहित शर्मा, ख्रिस गेल, जोस बटलर, शेन वॉटसन, एबी डीविलियर्स, एम एस धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), ड्वेन ब्रावो, किरोन पोलार्ड, सुनील नारेन, लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह</p>