Hardik Pandya Wedding: के.एल. राहुलचा जिगरी यार हार्दिक पांड्या हा आपल्या लग्नाच्या तीन वर्षांनी आता पुन्हा लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. एकीकडे के. एल. राहुल- आथिया शेट्टीचं रॉयल लग्न लागताच आता पांड्याला पण थाटामाटात लग्न करण्याचा मोह आवरत नसल्याचे म्हंटले जात आहे. हार्दिकच्या फॅन्सनी चिंता करायची गरज नाःई कारण हार्दिक स्वतःची नताशा स्टॅंकोव्हिकसहच लग्नगाठ बांधणार आहे. तीन वर्षांपूर्वी हार्दिक नताशा कोर्टात लग्न करून एकमेकांचे अधिकृत पार्टनर्स झाले होते, या जोडप्याने लग्नाच्या वर्षभरातच अगस्त्य या गोंडस बाळाला जन्मही दिला होता. पण हार्दिकला आता पारंपरिक पद्धतीने व रॉयल लग्नाची इच्छा होत असल्याने पुन्हा एकदा हे लव्हबर्ड्स सर्व कुटुंब व परिवारासह मोठ्या थाटात लग्न करणार आहेत.

हिंदुस्थान टाइम्सच्या माहितीनुसार हार्दिक व नताशा राजस्थानमधील उदयपूर येथील एका भव्य पॅलेसमध्ये लग्न करणार असल्याचे समजत आहे. व्हॅलेंटाईन डे म्हणजेच १४ फेब्रुवारीला ते ख्रिश्चन पद्धतीने प्रेमाच्या आणाभाका घेत लग्न करणार आहेत. HT ने हार्दिकच्या जवळच्या मित्राचा हवाला देत सांगितले की, “आधी त्यांनी कोर्टात लग्न केले. हा निर्णय घेतल्यावर घाई झाली. लग्न थाटामाटात करण्याची कल्पना तेव्हापासूनच त्यांच्या मनात आहे. ते सर्व याबद्दल खूप उत्सुक आहेत. विवाह सोहळा १३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून १६ फेब्रुवारी पर्यंत सर्व विधी असतील.”

आतापर्यंतच्या अपडेट्सनुसार हार्दिक व नताशा हे ख्रिश्चन लग्न व भारतीय रीतीरिवाजांनुसार दोन्ही पद्धतीने लग्न करणार आहेत. यापूर्वी प्रियांका चोप्रा व निक जोनसने सुद्धा असेच लग्न केले होते. लग्नात हळदी, मेहंदी आणि संगीत मोठ्या उत्साहात आयोजित केले जातील, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या सोहळ्याची तयारी सुरू झाली होती, असे हार्दिकच्या मित्राने सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हार्दिक आणि नताशा, ३१ मे २०२० रोजी घरगुती पद्धतीने लग्न केले होते. या जोडप्याला जुलै २०२० मध्ये त्यांचा मुलगा अगस्त्य झाला. या संदर्भातील हार्दिक व नताशाने अद्याप तरी पुष्टी केलेली नाही.