Hasan Mahmud Creates History in IND vs BAN 1st test: भारत बांगलादेशमध्ये चेन्नई येथे खेळवल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजाने इतिहास घडवला आहे. बांगलादेशने पहिल्या दिवशी हसन महमूदच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताला बॅकफूटवर टाकले. पण भारताच्या खालच्या फळीतील अष्टपैलू खेळाडू आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर दमदार फलंदाजी केली. तर आर अश्विनने आपल्या घरच्या मैदानावर शतक झळकावून भारतीय संघाचा डाव सावरला. हसन महमूदने बुमराहला बाद करत पाचवी विकेट मिळवली आणि भारताच्या भूमीवर अशी कामगिरी केली जी आजवर कोणत्याही बांगलादेशी खेळाडूला जमली नाही.

दुसऱ्या दिवशी अश्विन आणि जडेजाच्या नजरा मोठ्या धावसंख्येवर होत्या. पण तस्किन अहमदने ही भागीदारी तोडून भारताला ७वा धक्का दिला. यानंतर आर अश्विनही ११३ धावांवर झेलबाद झाला. यानंतर हसन महमूदने जसप्रीत बुमराहला बाद करून टीम इंडियाला सर्वबाद केल्याने भारतीय डाव ३७६ धावांवर आटोपला.

IND vs BAN Rishabh Pant apologized to Mohammed Siraj video viral
IND vs BAN : मोहम्मद सिराज संतापल्याने ऋषभ पंतला मागावी लागली माफी, नेमकं कारण काय? पाहा VIDEO
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Jasprit Bumrah Completes 400 Wickets in International Cricket IND vs BAN 1st test
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चारशे पार; कपिल देव, शमी, झहीर यांच्या मांदियाळीत पटकावले स्थान
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
IND vs BAN Basit Ali Slams Bangladesh Captain Najmul Hossain Shanto
IND vs BAN : ‘शांतोने भारताबरोबर ‘तो’ माईंड गेम खेळायला नको होता’, बासित अलीने बांगलादेशच्या कर्णधारावर साधला निशाणा
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
India vs bangladesh 1st Test Day 2 Updates in Marathi
IND vs BAN Test Day 2: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारताने किती धावा केल्या, जाणून घ्या
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?

हेही वाचा – IND vs BAN Test Day 2: बांगलादेशला फॉलोऑनपासून वाचण्यासाठी इतक्या धावांची आवश्यकता, भारताला २ विकेट्सची प्रतिक्षा

चेन्नई कसोटीत पहिल्याच दिवशी भारतीय टॉप ऑर्डरला एकहाती बाद करणाऱ्या हसन महमूदने दुसऱ्या दिवशी बुमराहच्या रूपाने त्याची ५वी विकेट घेण्यात यश मिळविले. अशा प्रकारे या २४ वर्षीय बांगलादेशी वेगवान गोलंदाजाने भारतीय भूमीवर नवा इतिहास लिहिला आहे. हसन महमूदने पहिल्या दिवशी अप्रतिम गोलंदाजी करत भारताचे पहिले ४ विकेट घेतले. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवल्यानंतर त्याने विराट कोहली आणि ऋषभ पंतलाही बाद केले. यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी बुमराहला बाद करून कारकिर्दीतील चौथ्या कसोटी सामन्यात सलग दुसऱ्यांदा पाच विकेट हॉल घेत खळबळ उडवून दिली.

हेही वाचा – IND vs BAN: “तो बांगलादेशचा संघ आहे, त्यामुळे…”, सेहवागचा ‘तो’ सल्ला अश्विन-जडेजाने मानला अन् बांगलादेशी गोलदाजांची केली धुलाई

भारतात ५ विकेट घेणारा हसन महमूद बांगलादेशचा पहिला गोलंदाज

हसनने २२.२ षटकांमध्ये ५ विकेट्स घेतले. यासह तो भारतीय भूमीवर कसोटी सामन्याच्या एका डावात ५ विकेच घेणारा बांगलादेशचा पहिला गोलंदाज ठरला. सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात ५ विकेट घेण्याचा पराक्रम त्याने केला. याआधी त्याने रावळपिंडीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानविरूद्ध ५ विकेट्स घेतले होते.

हेही वाचा – ENG vs AUS: ट्रेव्हिस हेडने विक्रमी खेळीसह मोडला रोहित शर्माचा वनडेमधील मोठा विक्रम, ‘बॅझबॉल’चाही उडवला धुव्वा

कसोटीत भारतीय भूमीवर बांगलादेशी गोलंदाजांची सर्वोत्तम कामगिरी

५/८३ – हसन महमूद, चेन्नई, २०२४
४/१०८ – अबू झायेद, इंदूर, २०१९
३/५५ – तस्किन अहमद, चेन्नई, २०२४
३/८५ – अल-अमीन हुसैन, कोलकाता, २०१९
३/९१ – इबादत हुसेन, कोलकाता, २०१९