ICC Men’s ODI Team of the year: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०२२ साठी वर्षातील एकदिवसीय संघ निवडला आहे. आयसीसीच्या या ११ सदस्यीय संघात भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना स्थान मिळालेले नाही. आयसीसीने आपल्या संघाचे कर्णधारपद पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमच्या हाती दिले आहे. आयसीसीच्या या वनडे संघात फक्त दोन भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. हा खेळाडू मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आहे. या संघात न्यूझीलंडच्या टॉम लॅथमला यष्टिरक्षक म्हणून स्थान मिळाले आहे, जो भारतीय मालिकेतही कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे.

ICC ची वन डे टीम ऑफ द इयर २०२२ जाहीर केली आहे. २०२२ मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आले आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे, तर दोन भारतीय खेळाडूंनाही वन डे संघात स्थान देण्यात यश आले आहे. या एकदिवसीय संघात फक्त अशाच खेळाडूंचा समावेश आहे ज्यांनी २०२२ मध्ये बॉल, बॅट किंवा दोन्हीसह चमकदार कामगिरी केली आहे.

India's Possible Squad for World Cup 2024
T20 World Cup 2024 साठी मोहम्मद कैफने निवडला संघ, अश्विन ऐवजी ‘या’ खेळाडूला दिले स्थान, पाहा संपूर्ण संघ
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Mumbai Ranji cricketers get same match fee from MCA as BCCI
मुंबईच्या रणजी क्रिकेटपटूंची चांदी! ‘एमसीए’कडून ‘बीसीसीआय’इतकेच सामन्याचे मानधन
Sunil Chhetri
भारताचे विजयाचे लक्ष्य! अफगाणिस्तानविरुद्ध ‘फिफा’ विश्वचषक पात्रता सामना आज; छेत्रीकडून अपेक्षा

मागच्या वर्षी श्रेयस अय्यर अपयशी ठरला होता

श्रेयस अय्यरसाठी शेवटचे वर्ष म्हणजे २०२२ खूप चांगले होते. तो भारतीय संघासाठी वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने १७ सामन्यात ७२४ धावा केल्या. पण या नवीन वर्षाची २०२३ ची सुरुवात त्याच्यासाठी चांगली राहिलेली नाही. अय्यरने यंदा तीन सामने खेळले आहेत. श्रेयसने श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये २८, २८ आणि ३८ धावा केल्या. २०२२च्या अखेरीस श्रेयस अय्यरने दोन कसोटी सामने खेळले. त्यात दोन अर्धशतक केले आहेत, म्हणजेच श्रेयस अय्यरला २०२२ प्रमाणे यंदाही आपली आगपाखड दाखवता आलेली नाही. पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस न्यूझीलंडविरुद्धच्या सध्याच्या वन डे मालिकेतून बाहेर आहे. यादरम्यान वेगवान गोलंदाज सिराजने १५ सामने खेळले आणि २४ बळी घेतले. त्याने ४.६२ च्या इकॉनॉमी रेट आणि २३.५० च्या सरासरीने इतक्या विकेट घेतल्या. ३/२९ ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी होती.

हेही वाचा: IND vs NZ 3rd ODI: ‘कुल-चा’ इज बॅक! आजचा सामना जिंकून ICC वन डे रॅकिंगमध्ये नंबर १ येण्याची भारताला संधी

२०२२ च्या एकदिवसीय संघात ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी दोन खेळाडूंचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झॅम्पा आणि ट्रॅव्हिस हेडला संधी मिळाली आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथम आणि घातक गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांना न्यूझीलंडकडून स्थान मिळाले आहे. या खेळाडूंनी २०२२ मध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिजच्या शाई होप आणि अल्झारी जोसेफ यांना संधी मिळाली आहे.

1. बाबर आझम (कर्णधार), पाकिस्तान

2. ट्रॅव्हिस हेड – ऑस्ट्रेलिया

3. शाई होप – वेस्ट इंडिज

4. श्रेयस अय्यर – भारत

5. टॉम लॅथम (विकेटकीपर) – न्यूझीलंड

6. सिकंदर रझा – झिम्बाब्वे

7. मेहदी हसन मिराज – बांगलादेश

8. अल्झारी जोसेफ – वेस्ट इंडिज

9. मोहम्मद सिराज – भारत

10. ट्रेंट बोल्ट – न्यूझीलंड

11. अॅडम झाम्पा – ऑस्ट्रेलिया