आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुढील महिन्यात होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी खेळण्याच्या अटी (playing conditions) जाहीर केल्या आहेत. जगभरातील कोट्यावधी क्रिकेटप्रेमी उत्सुकतेने या सामन्याची वाट पाहत आहेत. १८ ते २२ जून दरम्यान हा सामना साऊथम्प्टन येथे खेळला जाईल.
आयसीसीने जाहीर केलेल्या अटी
- हा सामना ड्रॉ किंवा अनिर्णित राहिला, तर दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेता म्हणून घोषित केले जाईल.
- या सामन्यासाठी २३ जून हा दिवस ‘राखीव दिवस’ म्हणून ठेवण्यात आला आहे. पावसामुळे अथवा खराब वातावरणामुळे दिवस वाया गेला, तर राखीव दिवसाचा उपयोग होऊ शकतो.
- ग्रेड-१ ड्यूक चेंडूने हा सामना खेळला जाईल.
- जर शॉट रन असेल, तर तिसरा पंच ऑन-फील्ड पंचांच्या निर्णयानंतर स्वत: त्या निर्णयाचा रिव्ह्यू करेल. यानंतर, पुढचा चेंडू टाकण्यापूर्वी मैदानावरील पंचांशी बोलून आपला निर्णय सांगेल.
- क्षेत्ररक्षण संघाचा कर्णधार किंवा फलंदाज रिव्ह्यू घेण्यापूर्वी चेंडू खेळण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न केला आहे, की नाही याची खातरजमा पंचांसमवेत करू शकतो.
- एलबीडब्ल्यूच्या रिव्ह्यूसाठी, विकेट झोनमधील उंचीतील फरक स्टंपच्या वर वाढवला गेला आहे. स्टंपच्या आसपास फरक, उंची आणि रुंदी यासंदर्भात पंचांचा कॉल समान आहे का, याची खात्री करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा – “पाकिस्तानी चाहते प्रशिक्षकालाच शिव्या घालतात, म्हणून मला प्रशिक्षक व्हायचं नाही”
दोन्ही संघ –
भारत – रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा.
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला
न्यूझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग (यष्टीरक्षक), विल यंग.