Shahid Afridi on India vs Pakistan T20 World Cup 2024 : पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने भारत-पाकिस्तान सामन्याची तुलना अमेरिकेतील अत्यंत लोकप्रिय ‘सुपर बाउल’शी केली आहे. त्याला विश्वास आहे की हा खेळातील सर्वात मोठी सामना आहे. त्याच्यामध्ये जो संघ दबाव अधिक चांगल्या प्रकारे हाताळेल तो ९ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणारा सामना जिंकेल. टी-२० विश्वचषकात जेव्हा दोन्ही संघ शेवटचे आमनेसामने आले होते, तेव्हा विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला होता. आता क्रिकेटचा हा सर्वात मोठा सामना पहिल्यांदाच अमेरिकेच्या भूमीवर होणार आहे.

शाहिद आफ्रिदी आयसीसीसाठी लिहलेल्या आपल्या कॉलमध्ये म्हणाला, “मला भारताविरुद्ध खेळायला खूप आवडायचे आणि मला विश्वास आहे की ही खेळातील सर्वात मोठा महामुकाबला आहे. जेव्हा मी त्या सामन्यांमध्ये खेळायचो, तेव्हा मला भारतीय चाहत्यांकडून खूप प्रेम आणि आदर मिळाला आणि ते दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचे होते.” माजी अष्टपैलू खेळाडू पुढे म्हणाला, “भारताविरुद्ध हे प्रसंगाचे दडपण हाताळण्याबाबत आहे. दोन्ही संघांमध्ये भरपूर टॅलेंट आहे, त्यांना फक्त त्यादिवशी एकत्र येण्याची गरज आहे. हे या सामन्यात आणि संपूर्ण स्पर्धेत होईल. जो संघ आपला संयम राखेल तो जिंकेल.”

अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे टी-२० विश्वचषकाचे सह-यजमान आहेत. सुपर एट टप्पा आणि बाद फेरीचे सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत. आफ्रिदीच्या मते खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये प्रबळ दावेदार निवडणे कठीण आहे. माजी कर्णधार म्हणाला, “टी-२० क्रिकेट खूप अप्रत्याशित आहे आणि संघांच्या फलंदाजीमध्ये आता खूप खोली आहे. तुमचा आठव्या क्रमांकाचा फलंदाज १५० च्या स्ट्राइक रेटने धावा करून सामना जिंकवू शकतो. मला आशा आहे की यावेळी पाकिस्तान जिंकेल पण प्रबळ दावेदार निवडणे कठीण आहे.”

हेही वाचा – पहिलाच वर्ल्डकप खेळणाऱ्या संघाच्या कर्णधाराचे थेट ऑस्ट्रेलियाला ‘ओपन चॅलेंज’; म्हणाला, ‘प्रत्येक दिवस सारखा नसतो…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या स्पर्धेसाठी पाकिस्तानची तयारी फारशी चांगली नव्हती. संघाने इंग्लंडविरुद्धची ४ सामन्यांची टी-२० मालिका गमावली. त्याचबरोबर आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातही पराभव पत्करावा लागला होता. २०२४ मध्ये त्याच्या फॉर्ममध्ये सातत्य नसले तरीही मला विश्वास आहे की वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्समध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांच्याकडे क्षमता आहे, असे शाहिद आफ्रिदीला वाटते. तो म्हणाला,”कॅरेबियन परिस्थिती त्यांच्यासाठी निश्चितच अनुकूल असेल. संघात खूप प्रतिभा आहे, विशेषत: जेव्हा तुम्ही गोलंदाजी आक्रमणाकडे बघता, जे येथे यशस्वी व्हायला हवे.”