Hardik pandya T20 World Cup 2024 winning post: अनेक वर्षांपासून भारतीय संघाचे चाहते पाहत असलेलं स्वप्न अखेर शनिवारी रात्री पूर्ण झालं. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० विश्वचषक २०२४ चा फायनल सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून टी-२० विश्वचषक जिंकला आहे. तब्बल १७ वर्षांनी भारतीय संघाला टी-२० च्या विजेत्याचा मान मिळविण्यात यश आलं आहे. या विजयानंतर भारतीय संघाचा शान असलेला खेळाडू हार्दिक पांड्या याला अश्रू अनावर झाले. दरम्यान, ट्रोलिंगचा सामना करणाऱ्या पांड्यानं विश्वचषक जिंकल्यानंतर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.

विश्वचषकाच्या या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाच्या विजयाचे अनेक शिल्पकार होते आणि त्यातील एक सर्वांत खास नाव म्हणजे हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्यानं अखेरच्या षटकात भारतीय संघाला विजय मिळवून दिला आणि तोच या सामन्याचा हीरो ठरला. अंतिम सामन्यामध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केल्यानंतर अष्टपैलू हार्दिक पांड्याला अश्रू अनावर झाले. दरम्यान, त्यानंतर हार्दिक पांड्यानं या ऐतिहासिक विजयानंतर आज सर्व भारतीयांसाठी एक खास पोस्ट व्हायरल केली आहे.

हे स्वप्न नाहीये तर..

हार्दिक पांड्यानं त्याचा एक फोटो पोस्ट केला आणि त्याखाली एक कॅप्शन लिहिली आहे. “गुड मॉर्निंग इंडिया; हे स्वप्न नाहीये तर खरं आहे की, आपण विश्वविजेते आहोत”, असं हार्दिक पांड्यानं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पाहा हार्दिक पांड्याची खास पोस्ट

हेही वाचा >> T20 World Cup 2024: ‘जेव्हा त्याचा विजय हा तुमचा विजय असतो’ ऐतिहासीक विजयानंतर रोहितच्या पत्नीला अश्रू अनावर

हार्दिक पांड्या प्रतिक्रिया

दरम्यान, सामन्यानंतर बोलताना हार्दिकनं आपल्या भावना व्यक्त केल्या. हार्दिक म्हणाला, ‘माझ्यासाठी हा अतिशय भावूक करणारा क्षण आहे. काहीतरी कुठेतरी चुकत होतं; पण आजचा दिवस खास होता. अख्खा देश भारताच्या विजयासाठी प्रार्थना करीत होता. गेल्या सहा महिन्यांत माझ्या आयुष्यात जे जे घडलं ते ते पाहता, हा विजय माझ्यासाठी विलक्षण असा आहे. मी कशाबद्दलही एक अक्षरही बोललो नाही. माझ्यावर अन्याय झाला; पण मला माहीत होतं की, माझा दिवस येईलच.

हेही वाचा >> T20 World Cup 2024: “चांगल्या लोकांबरोबर नेहमी चांगलंच होतं कारण…” ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माची खास प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या आठ विकेट्स घेतल्या. त्यात हार्दिक पांड्यानं तीन , अर्शदीप सिंह व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन व अक्षर पटेलनं एक विकेट घेतली. हार्दिक पांड्यानं शेवटच्या षटकामध्ये उत्तम गोलंदाजी करून दोन मोठ्या विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारतासाठी विजय अधिक सोपा झाला. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याला अश्रू अनावर झाले.