T20 World Cup 2024 Prize Money Announced: आयसीसी टी-२० विश्वचषकाला २ जूनपासून सुरुवात झाली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या यजमानपदाखाली होत असलेल्या या स्पर्धेत एकूण २० संघ खेळत आहेत. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके संघ एकत्र सहभागी होत आहेत. या संघांची प्रत्येकी पाच गटात विभागणी करण्यात आली आहे. दरम्यान, आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीस रक्कमही जाहीर केली आहे. यावेळी टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावणाऱ्या संघाला ऐतिहासिक बक्षीस रक्कम मिळणार आहे. यापूर्वी इतकी मोठी रक्कम कोणत्याही संघाला मिळाली नाही.

T20 Word Cup 2024 साठी किती आहे बक्षीसाची रक्कम

२०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी ICC ने एकूण ११.२५ दशलक्ष डॉलर बक्षीस रक्कम म्हणून देणारं आहे. ICC ने २०२२ च्या टी-२० विश्वचषकासाठी एकूण बक्षीस रक्कम ५.६ दशलक्ष डॉलर्स ठेवली होती. पण यावेळी आयसीसीने त्यात दुप्पट वाढ केली आहे. यावेळी विजेत्या संघाला २.४५ दशलक्ष डॉलर्स (USD) दिले जातील. जे भारतीय रुपयाप्रमाणे सुमारे २० कोटी रुपये आहेत. तर उपविजेत्या संघाला एकूण १. २८ दक्षलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयाप्रमाणे१०.५० कोटी इतकी आहे. २०२२ मध्ये जेतेपद पटकवलेल्या इंग्लंड संघाला १३ कोटी बक्षीसाची रक्कम मिळाली होती. तर ६.४४ कोटी रुपये उपविजेत्या पाकिस्तान संघाला देण्यात आले होते.

उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघांनाही यावेळी बक्षिसाची मोठी रक्कम मिळणार आहे. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघांना ६.५५ कोटी रुपये दिले जातील. त्याच वेळी, सुपर-८ मध्ये स्थान मिळवणाऱ्या संघांना ३.१८ कोटी रुपये दिले जातील. दुसरीकडे, ग्रुप स्टेजमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांना २.०६ कोटी रुपये मिळतील. याशिवाय सर्व संघांना १.८७ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्याच वेळी, सुपर-८ पर्यंत प्रत्येक सामना जिंकण्याऱ्या संघाला २५.९ लाख रुपये मिळतील.

टी-२० विश्वचषकासाठी बक्षीसाची रक्कम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टी-२० विश्वचषक २०२४ च्या विजेत्याला २०.३६कोटी रुपये
टी-२० विश्वचषक २०२४ च्या उपविजेता संघाला १०.६४ कोटी
उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना ६.५५ कोटी रुपये 
सुपर 8 -८धून बाहेर पडलेल्या संघांना ३.१८ कोटी रुपये
प्रत्येक गटात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांना २.०६ कोटी रुपये
उर्वरित सर्व संघांना १.८७ कोटी रुपये 
सुपर-८ पर्यंत प्रत्येक सामना जिंकण्यासाठी २५.९ लाख