ICC Womens ODI World Cup Timetable, India vs Pakistan: महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचे आयोजन बीसीसीआयकडून केले जाणार आहे. भारतात होणाऱ्या या स्पर्धेला ३० सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतात. दरम्यान भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ देखील आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना ३० सप्टेंबरला भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेच्या तारखा आणि ठिकांणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

भारत आणि पाकिस्तान सामना या स्पर्धेतील मुख्य आकर्षण असणार आहे. मात्र, हा सामना भारतात खेळवला जाणार नाही. भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे पाकिस्तानचा संघही भारतात येणार नाही. भारत आणि पाकिस्तान हा सामना श्रीलंकेतील कोलंबोत खेळवला जाणार आहे. हा सामना ५ ऑक्टोबरला खेळवला जाईल. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यासाठी कोलंबोला जावं लागणार आहे. तर पाकिस्तानचे सर्व सामने कोलंबोत खेळवले जाणार आहेत.

या स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना २९ ऑक्टोबरला गुवाहाटी किंवा कोलंबोत खेळवला जाऊ शकतो. जर पाकिस्तानने स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश केला तर कोलंबोत खेळवला जाईल. मात्र, पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचू शकला नाही, तर हा सामना गुवाहाटीमध्ये खेळवला जाईल. या स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना ३० ऑक्टोबरला बंगळुरूत खेळवला जाईल. तसेच या स्पर्धेतील फायनलचा सामना २ नोव्हेंबरला खेळवला जाईल. जर पाकिस्तानने फायनलमध्ये प्रवेश केला, तर हा सामना कोलंबोत खेळवला जाईल. जर पाकिस्तानचा संघ फायनलमध्ये प्रवेश करू शकला नाही, तर हा सामना बंगळुरूत खेळवला जाईल.

असं आहे महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

मंगळवार, ३० सप्टेंबर, भारत vs श्रीलंका,बंगळुरु – दुपारी ३ वाजता
बुधवार, २ ऑक्टोबर, ऑस्ट्रेलिया vs न्यूझीलंड, इंदुर – दुपारी ३ वाजता
गुरुवार, २ ऑक्टोबर , बांगलादेश vs पाकिस्तान, कोलंबो – दुपारी ३ वाजता
शुक्रवार, ३ ऑक्टोबर, इंग्लंडvsदक्षिण आफ्रिका, बंगळुरु – दुपारी ३ वाजता
शनिवार, ४ ऑक्टोबर, ऑस्ट्रेलियाvsश्रीलंका,कोलंबो – दुपारी ३ वाजता
रविवार, ५ ऑक्टोबर, भारत vsपाकिस्तान,कोलंबो – दुपारी ३ वाजता
सोमवार, ६ ऑक्टोबर, न्यूझीलंडvsदक्षिणआफ्रिका,इंदुर – दुपारी ३ वाजता
मंगळवार, ७ ऑक्टोबर, इंग्लंड vsबांगलादेश,गुवाहाटी – दुपारी ३ वाजता
बुधवार, ८ ऑक्टोबर, ऑस्ट्रेलियाvs पाकिस्तान,कोलंबो – दुपारी ३ वाजता
गुरुवार, ९ ऑक्टोबर , भारत vs दक्षिण आफ्रिका, विशाखापट्टणम – दुपारी ३ वाजता
शुक्रवार, १० ऑक्टोबर, न्यूझीलंड vs बांगलादेश, विशाखापट्टणम – दुपारी ३ वाजता
शनिवार, ११ ऑक्टोबर, इंग्लंड vs श्रीलंका, गुवाहाटी – दुपारी ३ वाजता
रविवार, १२ ऑक्टोबर, भारत vs ऑस्ट्रेलिया,विशाखापट्टणम – दुपारी ३ वाजता
सोमवार, १३ ऑक्टोबर, दक्षिण आफ्रिका vs बांगलादेश,विशाखापट्टणम – दुपारी ३ वाजता
मंगळवार, १४ ऑक्टोबर, न्यूझीलंडvs श्रीलंका,कोलंबो – दुपारी ३ वाजता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


बुधवार, १५ ऑक्टोबर, इंग्लंडvsपाकिस्तान,कोलंबो – दुपारी ३ वाजता
गुरुवार, १६ ऑक्टोबर, ऑस्ट्रेलियाvsबांगलादेश,विशाखापट्टणम – दुपारी ३ वाजता
शुक्रवार, १७ ऑक्टोबर, दक्षिण आफ्रिकाvs श्रीलंका ,कोलंबो – दुपारी ३ वाजता
शनिवार, १८ ऑक्टोबर, न्यूझीलंडvsपाकिस्तान,कोलंबो – दुपारी ३ वाजता
रविवार, १९ ऑक्टोबर, भारतvsइंग्लंड,इंदुर – दुपारी ३ वाजता
सोमवार, २० ऑक्टोबर, श्रीलंकाvsबांगलादेश, कोलंबो – दुपारी ३ वाजता
मंगळवार, २१ ऑक्टोबर, दक्षिण आफ्रिकाvs पाकिस्तान-कोलंबो – दुपारी ३ वाजता
बुधवार, २२ ऑक्टोबर, ऑस्ट्रेलिया vsइंग्लंड, इंदुर – दुपारी ३ वाजता
गुरुवार, २३ ऑक्टोबर, भारत vs न्यूझीलंड,गुवाहाटी – दुपारी ३ वाजता
शुक्रवार, २४ ऑक्टोबर, पाकिस्तानvs श्रीलंका, कोलंबो – दुपारी ३ वाजता
शनिवार, २५ ऑक्टोबर, ऑस्ट्रेलिया vsश्रीलंका, इंदुर – दुपारी ३ वाजता
रविवार, २६ ऑक्टोबर, इंग्लंड vsन्यूझीलंड, गुवाहाटी – दुपारी ३ वाजता
रविवार, २६ ऑक्टोबर, भारतvsबांगलादेश, बंगळुरू – दुपारी ३ वाजता
बुधवार, २९ ऑक्टोबर, सेमीफायनल १ (निर्धारित) गुवाहाटी/कोलंबो – दुपारी ३ वाजता
गुरुवार, ३० ऑक्टोबर, सेमीफायनल २ (निर्धारित) बंगळुरू – दुपारी ३ वाजता
रविवार, २ नोव्हेंबर फाइनल (निर्धारित) कोलंबो/बंगळुरू – दुपारी ३ वाजता