WTC 2025-17 Schedule Announced: दक्षिण आफ्रिका २०२३-२५ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला. WTCच्या अंतिम सामन्याच्या एका दिवसानंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) WTC २०२५-२७ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पुढील चक्र १७ जूनपासून सुरू होणार आहे. पहिला सामना श्रीलंकेतील गॅले येथे श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळवला जाईल.

वेळापत्रकानुसार, ऑस्ट्रेलिया यावेळी जास्तीत जास्त २२ सामने खेळेल, तर इंग्लंडला २१ सामने खेळावे लागतील. या वर्षाच्या अखेरीस अॅशेस मालिकेदरम्यान दोन्ही संघ एकमेकांशी भिडतील. तर भारतीय संघ २० जूनपासून नव्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मोहिमेला सुरूवात करणार आहे.

एकूण ७१ सामने असलेले आणि पुढील दोन वर्षांच्या कालावधीत होणाऱ्या WTC 2025-27 या चक्रामध्ये नऊ संघ सहभागी होतील. दोन वेळा उपविजेता ठरलेला भारतीय संघ शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली एका नवीन युगाला सुरूवात करेल. भारतीय संघ माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत २० जूनपासून हेडिंग्ले येथे अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसह सुरूवात करेल.

दक्षिण आफ्रिका घरच्या मैदानावर कधी खेळणार कसोटी सामना?

ऑगस्ट २०२४ पासून तेंबा बावूमाच्या नेतृत्वाखाली सलग नऊ कसोटी सामन्यांमध्ये अपराजित राहिलेला नवीन विश्वविजेता दक्षिण आफ्रिका ऑक्टोबर २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये नवीन चक्रातील पहिली कसोटी मालिका खेळेल. तथापि, दक्षिण आफ्रिकेचे चाहते १५ महिन्यांनंतर सप्टेंबर २०२६ मध्ये संघाला घरच्या मैदानावर कसोटी खेळताना पाहतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

WTC 2025-27 च्या चक्रामध्ये भारत किती सामने खेळेल?

२०२५-२७ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चक्रात भारत १८ कसोटी सामने खेळणार आहे, ज्यामध्ये वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका, तसेच इंग्लंड, श्रीलंका आणि न्यूझीलंड दौऱ्यावर संघ जाणार आहे.

संघसर्व सामने
एकूणघरच्या मैदानावरइतर संघांच्या मैदानावर
ऑस्ट्रेलिया२२इंग्लंड (५)
न्यूझीलंड (४)
बांगलादेश (२)
वेस्ट इंडिज (३)
दक्षिण आफ्रिका (३)
भारत (५)
बांगलादेश१२पाकिस्तान (२)
वेस्ट इंडिज (२)
इंग्लंड (२)
श्रीलंका (२)
दक्षिण आफ्रिका (२)
ऑस्ट्रेलिया (२)
इंग्लंड२१भारत(५)
न्यूझीलंड (३)
पाकिस्तान (३)
ऑस्ट्रेलिया (५)
दक्षिण आफ्रिका (३)
बांगलादेश (२)
भारत१८वेस्ट इंडिज (३)
दक्षिण आफ्रिका (२)
ऑस्ट्रेलिया (५)
इंग्लंड (५)
श्रीलंका (२)
न्यूझीलंड (२)
न्यूझीलंड१६वेस्ट इंडिज (३)
भारत (२)
श्रीलंका (२)
इंग्लंड (३)
ऑस्ट्रेलिया (४)
पाकिस्तान (२)
पाकिस्तान१३दक्षिण आफ्रिका (२)
श्रीलंका (२)
न्यूझीलंड (२)
बांगलादेश (२)
वेस्ट इंडिज (२)
इंग्लंड (३)
दक्षिण आफ्रिका१४ऑस्ट्रेलिया (३)
बांगलादेश (२)
इंग्लंड (३)
पाकिस्तान (२)
भारत (२)
श्रीलंका (२)
श्रीलंका१२बांगलादेश (२)
भारत (२)
दक्षिण आफ्रिका (२)
वेस्ट इंडिज (२)
पाकिस्तान (२)
न्यूझीलंड (२)
वेस्ट इंडिज१४ऑस्ट्रेलिया (३)
श्रीलंका (२)
पाकिस्तान (२)
भारत (२)
न्यूझीलंड (३)
बांगलादेश (२)