अहवालात असे म्हटले आहे की, २०२२ मध्ये ९२ देशांमधील १२ क्रीडा स्पर्धांमध्ये १२१२ सामने झाले, जे संशयास्पद होते. ‘स्पोर्टडार इंटिग्रिटी सर्व्हिसेस’ ही तज्ञांची आंतरराष्ट्रीय टीम आहे, जी अनियमित सट्टेबाजी, सामन्यांची चौकशी करते. जी बेकायदेशीर बेटिंग, मॅच फिक्सिंग आणि खेळातील भ्रष्टाचाराच्या इतर प्रकारांचे विश्लेषण करते. सामन्यातील कोणत्याही प्रकारची हालचाल शोधण्यासाठी कंपनी युनिव्हर्सल फ्रॉड डिटेक्शन सिस्टम (UFDS) ऍप्लिकेशन वापरते.
फुटबॉल सामन्यांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार झाला –
या अहवालानुसार फुटबॉल हा खेळ भ्रष्टाचाराच्या बाबतीत अव्वल ठरला आहे. गेल्या वर्षी एकूण ७७५ फुटबॉल सामने झाले. ज्यात फिक्सिंगचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या यादीत बास्केटबॉल दुसऱ्या क्रमांकावर आहे. ज्यांचे २२० सामने संशयास्पद होते. तिकडे लॉन टेनिसच्या ७५ सामन्यांवर प्रश्न निर्माण झाला. या यादीत क्रिकेट सहाव्या क्रमांकावर आहे आणि केवळ १३ सामने असे होते ज्यात भ्रष्टाचाराचा आरोप आहे.
हेही वाचा – WPL 2023 MI vs UPW: महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात ‘या’ झेलवरून झाला गोंधळ, पाहा VIDEO
भारतात एकही क्रिकेट सामना फिक्स झालेला नाही –
स्पोर्टडार इंटिग्रिटी सर्व्हिसेसद्वारे नोंदवलेले १३ क्रिकेट सामने संशयास्पद आहेत. अहवालात दाखवलेल्या ग्राफिक्सनुसार, भारतात खेळल्या गेलेल्या कोणत्याही क्रिकेट सामन्यात फिक्सिंग झालेले नाही. स्पोर्टडारने २०२० मध्ये आयपीएल सामन्यांदरम्यान बेटिंगमधील अनियमितता शोधण्यासाठी बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी युनिटसोबत भागीदारी केली. अहवालानुसार, असे काही खेळ आहेत ज्यात फिक्सिंगची प्रकरणे शून्यावर आली आहेत. हँडबॉल आणि फुटबॉलमध्येही आतापर्यंतचे सर्वात संशयास्पद सामने नोंदवले गेले.
महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत ही बाब समोर आली होती –
क्रिकेटमध्ये फिक्सिंगशी संबंधित प्रकरणे अनेकदा समोर येतात. गेल्या महिन्यात झालेल्या महिला टी-२० विश्वचषकात फिक्सिंगचा संशय अधिक गडद झाला होता. त्यानंतर ढाक्याचे न्यूज आउटलेट जमुना टीव्हीने एक ऑडिओ टेप जारी केला होता, ज्यामध्ये बांगलादेशच्या दोन महिला क्रिकेटर्स बोलत होत्या. यातील एका खेळाडूचे नाव लता मंडल असल्याचे सांगितले जात असून ती बांगलादेशी संघासोबत दक्षिण आफ्रिकेला गेली होती. दुसरी क्रिकेटर शोहेली अख्तर जिची टी-२० विश्वचषकासाठी निवड झाली नव्हती. बीसीबीने आयसीसीलाही याबाबत माहिती दिली होती.
हेही वाचा – IPL 2023: बीसीसीआय आयपीएल २०२४ च्या पर्वात बांगलादेश-श्रीलंकेच्या खेळाडूंवर घालणार बंदी? जाणून घ्या काय आहे कारण
आयपीएल २०१३ मधील कथित स्पॉट फिक्सिंगमधून धडा घेत बीसीसीआयने अनेक पावले उचलली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल २०२३ संदर्भात बीसीसीआयने खेळाडूंना कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी बोलू नका आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. इंडियन प्रीमियर लीगचा १६वा सीझन ३१ मार्चपासून सुरू होत आहे.