ICC ODI Rankings Updates: आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिलने ताज्या आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. शुबमन गिलने वनडे क्रमवारीत अव्वल पाच फलंदाजांच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवाणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. त्याने ताज्या क्रमवारीत विराट कोहली आणि रोहित शर्माला मागे टाकले आहे.

शुबमन गिल पाचव्या क्रमांकावर पोहोचला –

भारतीय फलंदाज शुबमन गिल या वर्षात आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला आहे. या फॉर्ममुळे त्याने आयसीसी वनडे क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. गिल फलंदाजी क्रमवारीत ७३३ रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने रँकिंगमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांना मागे टाकले आहे.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Shubman Gill Surpasses Virat Kohli and Sanju Samson in Unique Record
IPL 2024: शुबमन गिलने विराट-सॅमसनला मागे टाकत रचला इतिहास, आयपीएलमध्ये हा पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: मयंक यादवने स्वतःचाच विक्रम मोडला, आयपीएलमधील वेगवान गोलंदाजांच्या यादीत मिळवले स्थान

हेही वाचा – Team India: टीम इंडियाला मोठा धक्का; ‘हा’ बलाढ्य खेळाडू आयपीएल आणि डब्ल्यूटीसी फायनलमधून बाहेर होणार

एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत विराट कोहली स्टीव्ह स्मिथबरोबर सातव्या क्रमांकावर आहे, त्याचे रेटिंग पॉइंट ७१४ आहेत. त्याचवेळी रोहित शर्मा ७०४ रेटिंगसह ९व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ८८७ रेटिंगसह आयसीसी वनडे फलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.

मोहम्मद सिराजचे नुकसान –

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत मोठा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याला मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी धुलाई केली होती. त्यानंतर त्याने आपले नंबर-१ स्थान गमावले. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आता नंबर-१ वनडे गोलंदाज बनला आहे, तर सिराज तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. हेजलवुडनंतर ट्रेंट बोल्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – IND vs AUS 3rd ODI: सामना सुरु होताच विराट कोहलीने लुंगी डान्स गाण्यावर धरला ठेका, पाहा VIDEO

शुबमन गिलच्या जलद एक हजार धावा –

शुबमन गिलने नुकताच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा भारतीय बनण्याचा पराक्रम केला आहे. शुबमनने १९ डावातच एक हजार धावा पूर्ण केल्या होत्या. भारतासाठी वनडेमध्ये सर्वात जलद एक हजार धावा करण्याच्या बाबतीत शुबमन गिलने विराट कोहली आणि शिखर धवनला मागे टाकले होते. विराट कोहली आणि शिखर धवनने २४-२४ डावात एक हजार धावा केल्या , तर नवज्योत सिंग सिद्धूने २५ आणि श्रेयस अय्यरने २५ एकदिवसीय डावात एक हजार धावा केल्या आहेत.