India vs Australia Rohit Sharma Century: गुरुवारपासून (दि. ९ फेब्रुवारी) नागपूर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा आर.अश्विनने रोहित शर्माला साथ देत छोटी भागीदारी केली मात्र तो २३ (६७) धावा करून बाद झाला. त्यानंतर भारताची नवी भिंत अशी ओळख असलेला मिस्टर डिपेंडंट चेतेश्वर पुजारा खराब स्वीप शॉट खेळून ७ (१४)धावा करून बाद झाला. यावेळी कर्णधार रोहित शर्माने एक बाजू सांभाळून धरत झुंजार शतक झळकावले. त्याने १७१ चेंडूत शतक पूर्ण केले. त्याचे हे कसोटीतील ९वे शतक आहे. एका बाजूला सर्वजण बाद होत असताना त्याने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली.

कर्णधार रोहित शर्माने शतकासह जबरदस्त कारनामा केला आहे. सरासरीच्या बातमीत विशेष म्हणजे, त्याने या यादीत ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर दुसरे स्थान पटकावले आहे. चला तर जाणून घेऊया रोहितने नेमका काय विक्रम केला आहे. १४ चौकार आणि २ षटकारांचा साज चढवत दमदार शतक पूर्ण केले. कर्णधार म्हणून त्याचे हे पहिले शतक आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू तेव्हा कर्णधार रोहित शर्मासोबत रविचंद्रन अश्विन खेळपट्टीवर तंबू गाडून उभे होते. दोन्ही फलंदाजांना चांगली भागीदारी करून टीम इंडियाला चांगली आघाडी वाढवायला मदत केली. रोहितला साथ द्यायला विराट कोहली आला असून दोघेमिळून भारताचा डाव पुढे नेत होते मात्र उपहारानंतर मर्फीच्या पहिल्याच चेंडूवर त्याने किंग कोहलीला बाद केले. तो १२ (२६) धावा त्याने केल्या. कसोटीत पदार्पण झालेला सूर्यकुमार यादव देखील फारसे काही करू शकला नाही. त्याने केवळ ८(२०) धावा केल्या.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आयपीएलचे सर्व सीझन खेळलेल्या रोहित शर्माने रचला इतिहास, पंजाबविरूद्धचा सामना सुरू होताच हिटमॅनच्या नावे मोठी कामगिरी
Mumbai Indians Vs Delhi Capitals Delhi Capitals Match Updates in Marathi
MI vs DC : रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करणारा विराट कोहलीनंतर ठरला दुसराच खेळाडू
Trent Boult created history in IPL
MI vs RR : बोल्टने मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावत रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला गोलंदाज

१३५ धावांवर भारताची तिसरी विकेट पडली. टॉड मर्फीने चेतेश्वर पुजाराला स्कॉट बोलंडकरवी झेलबाद केले. पुजाराने १४ चेंडूत सात धावा केल्या. साधारणपणे सावध फलंदाजी करणारा पुजारा या सामन्यात आक्रमक फटके खेळताना बाद झाला. मर्फीचा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर होता आणि पुजाराने तो स्वीप करून चार धावा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ३० यार्डांच्या आत उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाला पार करू शकला नाही आणि बोलंडच्या झेलने बाद झाला. आता कर्णधार रोहित शर्मासोबत रवींद्र जडेजा खेळपट्टीवर आहे. भारताची धावसंख्या ६७ षटकांनंतर ५ बाद १८९ अशी आहे.

हेही वाचा: IND vs AUS: स्लेजिंगचा नवा अध्याय! आता सुरु झाली बॉर्ड-गावसकर ट्रॉफी, केवळ मैदानातच नव्हे तर कॉमेंट्री बॉक्स मध्येही भिडले दिग्गज

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. दोन धावांच्या स्कोअरवर संघाचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी ८२ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सांभाळला, पण जडेजाने एका षटकात दोन विकेट घेत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर आणले. यानंतर त्याने स्मिथलाही बाद केले. पीटर हँड्सकॉम्ब आणि अ‍ॅलेक्स कॅरी यांनीही अर्धशतकी भागीदारी केली, मात्र अश्विनने ही जोडी फोडली. यानंतर त्याने जडेजाच्या साथीने ऑस्ट्रेलियाचा डाव १७७ धावांवर संपुष्टात आणला.