गेल्या काही काळापासून केएल राहुल हा समीक्षकांच्या निशाण्यावर आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दोन कसोटी सामने संपत आल्याने त्याने आपल्या टीकाकारांना अधिक संधी दिली आहे. केएल राहुल नागपूर कसोटीत फ्लॉप झाल्यानंतर, दिल्ली कसोटीच्या दोन्ही डावांतही वाईटरित्या फ्लॉप झाला आणि त्याचा फ्लॉप शो पाहून भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने उघडपणे त्याच्यावर राग काढला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यंकटेश बराच काळ राहुलच्या खराब फॉर्मवर प्रतिक्रिया देताना दिसत आहे आणि यावेळी त्याने संघ व्यवस्थापनावरही आपला राग काढला आणि म्हटले की राहुलला इतक्या संधी देणे पूर्णपणे समजण्यासारखे नाही. व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विटरवर एकामागून एक ट्विट करून आपले मन मोकळे केले पण त्याच दरम्यान आकाश चोप्राने केएल राहुलच्या बचावासाठी उडी घेतली आणि त्यानंतर व्यंकटेश आणि आकाश यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले.

व्यंकटेश प्रसाद आणि आकाश चोप्रा सोशल मीडियावर भिडले

व्यंकटेश प्रसादचे ट्विट पाहून आकाशने आधीच सांगितले होते की, त्याचे ट्विट आगीत इंधन भरत आहेत आणि आता त्याने पुन्हा एकदा व्यंकटेशच्या ट्विटला उत्तर दिले की, “वेंकी भाई, टेस्ट मॅच चल रहा है. किमान दोन्ही डाव संपण्याची वाट पाहिली तरी चालेल? आपण सर्व एकाच संघात आहोत म्हणजे टीम इंडिया. तुम्हाला तुमचे मत परत घेण्यास सांगत नाही पण वेळ थोडा चांगला असू शकतो. शेवटी, आमचा खेळ वेळेवर असतो.”

त्यानंतर व्यंकटेश प्रसाद आकाश चोप्राला प्रत्युत्तर देण्यास मागे हटले नाहीत आणि म्हणाले, “प्रामाणिकपणे, आकाश, काही फरक पडत नाही. मला वाटते की त्याने दुसऱ्या डावात अर्धशतक केले तरी ही टीका खूप योग्य आहे.” सामन्याच्या मध्यभागी किंवा सामना नंतर येथे अप्रासंगिक आहे. यूट्यूबवरील तुमच्या सुंदर व्हिडिओंबद्दल धन्यवाद, मी त्यांचा आनंद घेतो.”

पुढे बोलताना ते ट्वीटमध्ये म्हणाले की, “प्रतिभावान खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होण्याची संधी मिळत नाहीये. शिखरची कसोटी सरासरी ४०हून अधिक होती, मयंकची ४१हून अधिक होती, त्यात दोन द्विशतकही होते. शुबमन गिल शानदार फॉर्मात आहे. सरफराजला तर संघात कधी स्थान मिळेल देवचं जाणे तसच राहुलचा फॉर्म बाबतीत देखील देवालाच माहिती! त्यामुळे अनेक देशांतर्गत फर्स्टक्लास क्रिकेट सामन्यांतील खेळाडूंच्या कामगिरीकडे दुर्लक्ष केल्यासारखे आहे.”

हेही वाचा: IND vs AUS: “मॅच रेफरी-अंपायरने यात लक्ष घालावे…”, विराट कोहलीच्या LBWवर सुनील गावसकर-मार्क वॉ मध्ये जुंपली

व्यंकटेश प्रसादचे हे उत्तर दिल्ली कसोटीतील केएल राहुलच्या दुसऱ्या डावाच्या आधी आले आहे. “आम्ही तुम्हाला सांगतो की केएल राहुल दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या डावात केवळ १ धावा काढून बाद झाला होता, त्यामुळे आता तिसर्‍या आणि चौथ्या कसोटीतील त्याचे स्थान प्रश्न. सुद्धा उठवले जात आहेत आणि मला  बोलण्यासाठी पुरेसा वेळ आहे.” असे मत व्यंकटेश प्रसादने व्यक्त केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus akash chopra and venkatesh prasad clashed on twitter over kl rahul people expressed anger on social media too avw
First published on: 19-02-2023 at 19:00 IST