यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाची कामगिरी पाहाता जेतेपद भारतालाच मिळेल असा ठाम विश्वास भारतीय क्रिकेट चाहत्यांबरोबरच अनेक तज्ज्ञ आणि जागतिक स्तरावरील आजी-माजी खेळाडू व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. भारत व ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांची कामगिरी, त्यांच्या जमेच्या बाजू, कमकुवत दुवे यावर चाहते व तज्ज्ञांमध्ये चर्चा झडत आहेत. त्यात खेळपट्टीचा मुद्दा प्रामुख्याने चर्चिला जात आहे. यादरम्यान, अंतिम सामन्याच्या खेळपट्टीवर किती धावसंख्या पुरेशी ठरेल, याबाबतचा अंदाज समोर आला आहे.

खेळपट्टी चर्चेचा विषय!

भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य सामन्यासाठी नव्या खेळपट्टीऐवजी जुनी खेळपट्टीच वापरण्यात आल्याचा दावा आयसीसीचे खेळपट्टी सल्लागार अँडी अॅटकिन्सन यांनी केला होता. त्यापाठोपाठ आयसीसीनं असा कोणताही नियम नसल्याचा खुलासा करत यासंदर्भातली माहिती अॅटकिन्सन यांना आधीच दिली होती असंही स्पष्ट करत वादावर पडदा टाकला. त्यामुळे आता अंतिम सामन्यातील खेळपट्टीवरूनही चर्चा सुरू झाली आहे.

Chess Candidates 2024, World Championship contender, D Gukesh, Gukesh
अनुभवात कमी, रँकिंगमध्ये खाली…तरीही कँडिडेट्स स्पर्धेत गुकेश कसा ठरला विजयी? आनंदप्रमाणे जगज्जेता बनण्याची शक्यता किती?
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Manoj Tiwary criticizes Glenn Maxwell
IPL 2024 : मॅक्सवेलच्या फ्लॉप शोवर माजी भारतीय खेळाडूची सडकून टीका; म्हणाला, ‘तो वेळोवेळी फक्त पगार घेतोय पण…’

Ind vs Aus Final चं भाकित व्हायरल, मार्शनं स्कोअरकार्डच सांगितलं; म्हणे, “ऑस्ट्रेलिया ४५०…!”

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्यासाठी कोणती खेळपट्टी वापरली जाईल, याविषयी अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. खेळपट्टी सल्लागार अॅटकिन्सन खेळपट्टीचं निरीक्षण करून पुन्हा माघारीही परतले आहेत. त्यामुळे त्यांचं परीक्षण पूर्ण झाल्याचं आता मानलं जात आहे. दरम्यान, पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयचे दोन वरीष्ठ ग्राऊंड स्टाफ प्रमुख आशिष भौमिक व त्यांचे सहकारी तपोश चॅटर्जी यांनी १७ नोव्हेंबर रोजी खेळपट्टी तयार करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी बीसीसीआयचे देशांतर्गत क्रिकेट व्यवस्थापक अॅबी कुरुविला हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

कशी आहे अंतिम सामन्याची खेळपट्टी?

दरम्यान, अंतिम सामन्यासाठी तयार करण्यात येत असलेली खेळपट्टी नेमकी कशी आहे? याबाबत स्पष्ट माहिती नसली, तरी गुजरात क्रिकेट असोसिएशनमधील पीच क्युरेटरच्या हवाल्याने पीटीआयनं यासंदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे. बीसीसीआयचे क्रिकेट व्यवस्थापक ज्याअर्थी त्या खेळपट्टीवर हेवी रोलर फिरवला जात असल्याच्या प्रक्रियेचं मूल्यांकन करत होते, त्याअर्थी तिथे तशाच स्वरुपाची खेळपट्टी असेल, असं त्यांनी नमूद केलं आहे.

Ind vs Aus Final: ऑस्ट्रेलिया २ बाद ४५०! मार्शच्या भाकितावर तुफान मीम्स व्हायरल; म्हणे, “यांना महाराज, शम्सी आवरेनात आणि…!”

“जर इथल्या काळ्या मातीच्या खेळपट्टीवर अवजड रोलर फिरवला जात असेल, तर त्याचा अर्थ संथ फलंदाजीच्या अनुषंगाने खेळपट्टी बनवली जात आहे. या खेळपट्टीवर तुम्ही मोठी धावसंख्या निश्चितच उभारू शकता, पण सातत्याने मोठे फटके खेळणं फलंदाजांसाठी जिकिरीचं ठरू शकेल. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघासाठी धावसंख्येचा पाठलाग करणं अवघड होईल. याचा विचार करता पहिली फलंदाजी करण्यासाठी उतरणाऱ्या संघाला ३१५ धावा सामना जिंकण्यासाठी पुरेशा ठरतील”, असं या पीच क्युरेटरनं नमूद केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

कर्णधार रोहित शर्मा, राहुल द्रविडचं खेळपट्टीकडे लक्ष!

दरम्यान, या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, कर्णधार रोहित शर्मा व भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खेळपट्टीचा अंदाज घेतला असून भौमिक व चॅटर्जी यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याचंही सांगितलं जात आहे. त्याशिवाय, पहिल्या सामन्यापासून संघाला तडाखेबाज सुरुवात करून देणारा कर्णधार रोहित शर्मानं के. एल. राहुल व रवींद्र जडेजासह शुक्रवारी प्रसिध कृष्णा, रवीचंद्रन अश्विन व इशान किशन यांच्यासमोर कसून सराव केला.