scorecardresearch

Premium

IND vs AUS: टीम इंडियाच्या बंगळुरूमधील विजयावर मॅथ्यू हेडनचा गंभीर आरोप; म्हणाला, “अंपायरशी हातमिळवणी…”

IND vs AUS 5th T20: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा सामना वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. टीम इंडिया आणि अंपायर यांची संगनमत असल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने केला आहे.

During Arshdeep Singh's final over in the 5th T20I Matthew Hayden pointed towards the umpire and said It's done second time
टीम इंडिया आणि अंपायर यांची संगनमत असल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने केला आहे. सौजन्य- (ट्वीटर)

India vs Australia 5th T20 Match: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने एकतर्फी विजय मिळवला आहे. भारताने या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा ४-१ असा पराभव करत मालिका जिंकली आहे. भारतीय संघाने विश्वचषकातील पराभवाचे दुखणे कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ऑस्ट्रेलियाला फक्त या मालिकेत एकच सामना जिंकता आला आहे, त्यामुळे मॅथ्यू हेडन नाराज झाला. आधी वर्ल्डकपमधील विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू विचित्र गोष्टी करताना दिसत होते, आता मालिकेतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने भारतावर आरोप केले आहेत.

२०व्या षटकातील घटनेवर मॅथ्यू हेडनने व्यक्त केली नाराजी

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने भारतावर आरोप करत भारतीय संघाने पंचांशी संगनमत केल्याचं म्हटलं आहे. हेडन म्हणतो की, “भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा सामना आम्ही जिंकला असता, पण अंपायरने आमचा पराभव केला आहे. अर्शदीप सिंग अंपायरकडे बघून तो भारतीय संघाशी संगनमत करत असल्याचे दिसत होते.” ऑस्ट्रेलियाने भारतावर केलेल्या या आरोपामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या दोन चेंडूत ९ धावांची गरज असताना ही घटना घडली.

Sunil Gavaskar Big Statement About Virat Kohli
Virat Kohli : ‘…तो आयपीएलही खेळणार नाही’, किंग कोहलीबद्दल सुनील गावसकरांचं मोठं वक्तव्य
Mohammad Amir Praises Virat Video Viral
VIDEO : विराटच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल की बाबरच्या? पाकिस्तानच्या गोलंदाजाने दिले चकीत करणारे उत्तर
India Vs England 3rd Test Rohit Sharma Video Viral
IND vs ENG : रोहित शर्माने बूट उचलला, अन् जैस्वाल-सर्फराझसह इंग्लंडचे खेळाडू फिरले माघारी, VIDEO व्हायरल
Umpire stops Australia Wicket celebrations no appeal For run out Rule For Not Out AUS vs WI T20I Highlights Second Win After IND vs AUS
ऑस्ट्रेलियाचं सेलिब्रेशन पंचांनी थांबवलं; बाद असूनही ‘त्याला’ घोषित केलं नाबाद, क्रिकेटचा हा नियम काय सांगतो?

हेही वाचा: आर्चरला IPL २०२४मध्ये खेळणे कठीण, इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; काय आहे त्यामागील कारण? जाणून घ्या

अंपायरने मुद्दाम चेंडू रोखला

अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १० धावांची गरज होती. शेवटच्या दोन चेंडूत ९ धावांची गरज असताना पाचव्या चेंडूवर नॅथन एलिसने जोरदार फटका मारला, पण चेंडू अंपायरला लागला. अंपायरला जर चेंडू लागला नसता तर तो सीमारेषेबाहेर जाणार हे निश्चित होते, पण अंपायरला लागल्यानंतर चेंडू तिथेच थांबला. यावर अंपायरने जाणीवपूर्वक चेंडू रोखल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने केला आहे. तो म्हणाला, “टीम इंडियाने अंपायरशी हातमिळवणी केली होती. याशिवाय २०व्या षटकाचा पहिला चेंडू मॅथ्यू वेडच्या डोक्यावरून गेला, हा चेंडू वाईड द्यायचा होता, पण अंपायरने तो दिला नाही. या कारणामुळे आम्हाला असे वाटते की, भारतीय संघ आणि अंपायर यांच्यात संगनमत होते,” असा आरोप त्याने केला आहे.

कुलदीप आणि जडेजाची जागा निश्चित झाली

सध्याची कामगिरी पाहता कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांचे संघात स्थान निश्चित मानले जात आहे. आता तिसऱ्या फिरकीपटूची निवड होणार आहे. जर अलीकडच्या कामगिरीवर नजर टाकली तर रवी बिश्नोई इतर खेळाडूंच्या तुलनेत पुढे असल्याचे दिसते. त्याला अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल यांच्याकडून कडवी स्पर्धा आहे.

हेही वाचा: Hardik Pandya: हार्दिक पंड्यासाठी BCCI आणि NCAचा खास प्लॅन! काय आहे १८ आठवड्यांचा हाय परफॉर्मन्स प्रोग्राम? जाणून घ्या

चहलपेक्षा बिश्नोईला पसंती मिळण्याची खात्री आहे

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी रवी बिश्नोईची निवड हा संघ व्यवस्थापनाच्या दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे. विश्वचषकापूर्वी भारताला सहा टी-२० सामने खेळायचे आहेत आणि २३ वर्षीय रवी बिश्नोईला युजवेंद्र चहलच्या आधी प्राधान्य मिळणार असल्याचे समजते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी चहल भारतीय संघाचा भाग नाही. त्याची वन डे मालिकेसाठी निवड झाली आहे. चहलने यावर्षी नऊ टी-२० सामन्यांत नऊ विकेट्स घेतल्या आहेत. तर बिश्नोईने ११ सामन्यात १८ विकेट्स घेतल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs aus indias victory surrounded by controversies matthew hayden accused of collusion with the umpire avw

First published on: 05-12-2023 at 15:43 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×