Matthew Hayden on Steve Smith: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपुरातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाचे झेल सोडले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने स्टीव्ह स्मिथच्या स्लिप क्षेत्ररक्षणावर टीका केली होती. रोहितची झेल घेण्याची संधी खूपच कठीण होती तर दिवसाच्या शेवटच्या दुसऱ्या चेंडूवर जडेजाचा झेल ही कमी-अधिक प्रमाणात आरामदायक संधी होती. स्मिथला पहिल्या स्लिपमध्ये आलेला चेंडू चांगल्या उंचीवर आला परंतु त्याला प्रतिक्रिया देण्यास उशीर झाला आणि तो त्याच्या हाताला आदळला आणि जमिनीवर पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन ऑन-एअर म्हणाला, “स्लिप फिल्डरसाठी हे किती भयानक स्वप्न आहे. झेल घेताना एकप्रकारे तो तिथे अदृष्य राहिला. त्याने त्यापेक्षा चांगला प्रयत्न करायला हवा होता. दिवसाच्या दुसऱ्या शेवटच्या चेंडूवर एकाग्रता महत्वाची होती. कदाचित तो नक्की बाद झाला असता आणि आज परिस्थिती वेगळी असते!”

अशीच भावना ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्क वॉ याने व्यक्त केली. परिस्थिती स्पष्ट करताना तो म्हणतो, “हे असे आहे की चेंडू त्याच्याकडे येईल असे त्याला वाटत नव्हते, तो खेळापासून दूर असल्यासारखं दिसतो. मैदानावर असताना तुम्ही सतर्क राहायला हवे. जेव्हा तुम्ही स्पिनर्सना पहिल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात फलंदाजी करत असल्याचे भासवायचे असते.”

भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही या विषयावर आपले मत मांडले. ते म्हणतात, “नक्कीच, तो कमी वाकत नव्हता. मला वाटत नाही की तो तेथे झेल येण्याची अपेक्षा करत होता. मागचा भाग वाकलेला नाही आणि झेल गुडघ्याकडे आला. त्यामुळे फरक पडू शकतो. भारताच्या डावाचा दिवस हा खूप मोठा आणि थकवणारा होता, परंतु शेवटच्या दोन चेंडूमध्ये तुमची एकाग्रता सर्वात जास्त तपासली जाते. स्टीव्ह स्मिथसाठी कठीण दिवस होता, त्याला ते जाणवेल. तो एक चांगला झेल पकडणारा खेळाडू आहे.”

हेही वाचा: Babar Azam: “टीम इंडियाला भारतात जाऊन हरवणार…” पाकिस्तानला वन डे वर्ल्ड कप जिंकून देण्याचे बाबर आझमने सांगितले २०२३चे लक्ष्य

नागपूर कसोटी टीम इंडियाने जिंकली

भारतीय संघाने नागपूर कसोटीत वर्चस्व गाजवले. टीम इंडियाने खेळपट्टी त्यांच्यासाठी पोषक बनवल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाकडून झाला. फिरकीपटूंना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर भारताने धावांचा डोंगर उभारून या आरोपांचा पार चुराडा केला. रवींद्र जडेजा, आर अश्विन यांच्या फिरकीसमोर ऑसी फलंदाज पार बेजार झाले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने ४०० धावा करून २२३ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी सुरूच राहिली आणि भारताने अडीच दिवसांत कसोटी जिंकली. भारताने १ डाव व १३२ धावांनी विजय मिळवताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये १०० विकेट्स या पायचीत म्हणून घेतल्या आहेत आणि तो वेगळ्या क्लबमध्ये सहभागी झाला. भारताच्या अनिल कुंबळेने १५६ पायचीत विकेट्स घेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानंतर मुथय्या मुरलीधरन (१५०), शेन वॉर्न (१३८) व रंगना हेरथ (१०८) यांचा क्रमांक येतो. मोहम्मद शमीने ९वी विकेट घेताना नॅथन लियॉनचा (८) त्रिफळा उडवला. स्टीव्ह स्मिथ नॉन स्ट्रायकर एंडला उभं राहून कांगारूंची पडझड पाहत राहिला. जडेजाने स्मिथची विकेट घेतली आणि भारताने जल्लोष सुरू केला, परंतु तो नो बॉल ठरला. शमीने शेवटची विकेट घेतली आणि ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ९१ धावांत गडगडला. भारताने १ डाव १३२ धावांनी हा सामना जिंकला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus rohit sharmas and ravindra jadeja miss catches by steve smith is like a nightmare said by matthew hayden avw
First published on: 11-02-2023 at 15:04 IST