IND vs AUS Team India’s celebration after Travis Head’s wicket : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिला सामना पर्थ येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांच्या शतकाच्या जौरावर ५३४ धावांचा पर्वत उभारला आहे. प्रत्त्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाची भारतीय गोलंदाजापुढे दाणादण उडाली. ऑस्ट्रेलिया संघाकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याची विकेट भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण होती, जी जसप्रीत बुमराहने मिळवून दिली. या विकेटनंतर भारतीय संघाने एकच जल्लोष केला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ट्रॅव्हिस हेडच्या विकेटनंतर टीम इंडियाचे आक्रम सेलिब्रेशन

भारतीय संघाने दिलेल्या ५३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाला सहावा धक्का ट्रॅव्हिस हेडच्या रुपाने बसला. कर्णधार जसप्रीत बुमराहने ट्रॅव्हिस हेडला यष्टिरक्षक पंतकरवी झेलबाद केले. तो १०१ चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने ८९ धावा करून बाद झाला. त्याने मिचेल मार्शसोबत सहाव्या विकेट्ससाठी ८७ चेंडूत ८२ धावांची भागीदारी केली होती, जी भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत चालली होती. तसेच ट्रॅव्हिस हेडला भारतीय संघासाठी नेहमी कर्दनकाळ राहिला आहे. त्यामुळे त्याची विकेट घेताच बुमराह-विराटसह संपूर्ण भारतीय संघाने आक्रमकपणे सेलिब्रेशन केले.

हेही वाचा – Virat Kohli : शतक झळकावून परतणाऱ्या विराटला गौतम गंभीरने मारली मिठी, दोघांचा भावनिक VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी दाखवली आपली ताकद –

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या डावात ६ बाद ४८७ धावा केल्यानंतर डाव घोषित केला. यशस्वी जैस्वाल, विराट कोहली आणि केएल राहुल यांनी टीम इंडियासाठी शानदार फलंदाजी केली. या खेळाडूंमुळेच टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरली. जैस्वालने १६१, कोहलीने नाबाद १०० आणि राहुलने ७७ धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारे टीम इंडियाकडे ४६ धावांची आघाडी होती. त्यामुळे त्याने ऑस्ट्रेलियाला ५३४ धावांचे लक्ष्य दिले आहे.