३० डिसेंबर रोजी सकाळी रुरकी येथे झालेल्या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ कार अपघातानंतर दुखापतीतून सावरत आहे. अशात भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी पंतबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, मला ऋषभ पंतला एक जोरात चापट मारायची आहे.

कपिल देव एबीपी अनकटवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेबद्दल बोलत होते. पंतबद्दल बोलताना म्हणाले, “माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे. मला तो बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे. जेव्हा तो बरा होईल, तेव्हा मी जाऊन त्याला जोरदार चापट मारणार आहे. कारण तू स्वतःची काळजी घे. बघ तुझ्या दुखापतीने संपूर्ण टीमचं कॉम्बिनेशन बिघडलं आहे. त्यामुळे तू लवकर बरा होण्यासाठी प्रेम आणि आपुलकी आहे. मग रागही येतो की अशा चुका आजची तरुणाई का करतात? त्यासाठी चापटही मारली पाहिजे.”

कपिल देव पुढे म्हणाले, “सर्वप्रथम त्याला आशीर्वाद आणि प्रेम. देव त्याला चांगले आरोग्य देवो. प्रथम त्याच्यासाठी हे आवश्यक आहे. सावरणे. मग पालकांचे कर्तव्य आहे की, जर मुलं चूक असतील तर त्यांनी चापट मारली पाहिजे.” बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताला पंतची उणीव भासेल. कारण तो कसोटी क्रिकेटमधील एक वेगळा पंत दिसून येतो. मग ते यष्टिरक्षणाबाबत असो वा जलद धावा काढणेबाबत असो.

हेही वाचा – WPL 2023: महिला आयपीएल लिलावाबद्दल मोठी घोषणा; ४०९ खेळाडूंचा असणार समावेश, जाणून घ्या कोण, कोणत्या गटात?

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , उमेश यादव , जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

हेही वाचा – ‘Valentines Day साजरा करण्यासाठी मला मदत करा’ म्हणणाऱ्या चाहत्याला कार्तिकने दिले मजेशीर उत्तर; जाणून घ्या काय म्हणाला

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ –

पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार) मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन आणि डेव्हिड वॉर्नर