भारत आणि बांगलादेश संघांत सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. ते दोन्ही सामने यजमान बांगलादेश संघाने जिंकले आहेत. त्यामुळे यजमानानी मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. आज दोन्ही संघात मालिकेतील अंतिम आणि तिसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला आपली लाज वाचवायची आहे. या सामन्याला सकाळी साडेअकराला सुरुवात होणार आहे.

तिसऱ्या सामन्याची नाणेफेक सकाळी अकराला पार पडेल. त्यानंतर सामना जहूर अहमद चौधरी स्टेडियम चट्टोग्राम येथे साडेअकराला सुरुवात होईल. दुसऱ्या सामन्यात दुखापत झाल्याने कर्णधार रोहित शर्मा मालिकेतून बाहेर पडला आहे. कॅच घेताना रोहितच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. तो मुंबईला परतला आहे. रोहितच्या जागी आता केएल राहुल तिसऱ्या वनडेत कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. त्याच्याबरोबर दीपक चहर आणि कुलदीप सेनदेखील दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत.

Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
sourav ganguly
पंत तंदुरुस्त, पण सिद्ध करण्यासाठी वेळ हवा – गांगुली
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024 : आज आरसीबीसमोर राजस्थानच्या विजय रथाला रोखण्याचे आव्हान, आतापर्यंत कोणाचे राहिले वर्चस्व? जाणून घ्या

तिसरा सामना हरला तर प्रथमच क्लीन स्वीप मिळणार –

भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धची ही तिसरी वनडे जिंकली तर त्याची लाज वाचेल. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच, तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाची स्थिती खराब झाली आणि पराभव पत्करावा लागला, तर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध नकोसा लाजिरवाणा विक्रम करेल.

वास्तविक, भारतीय संघ आणि बांगलादेश यांच्यातील ही पाचवी द्विपक्षीय वनडे मालिका आहे. सध्याच्या मालिकेसह, टीम इंडियाने आतापर्यंत ५ पैकी २ द्विपक्षीय वनडे मालिका गमावल्या आहेत. गेल्या वेळी २०१५ मध्ये बांगलादेशने २-१ असा पराभव केला होता. यावेळी जर भारतीय संघ तिसरा सामनाही हरला तर बांगलादेशविरुद्धची ही पहिलीच व्हाईट वॉश असेल. गेल्या वेळी म्हणजे २०१५ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

हेही वाचा – Fifa World Cup 2022: मेस्सीने रचला इतिहास; पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँडचा पराभव करत अर्जेंटिना उपांत्य फेरीत

भारताला प्रतिष्ठा वाचवण्यासाठी करो या मरोचा सामना –

बांगलादेश आजचा सामना जिंकला तर प्रथमच वनडे मालिकेत टीम इंडियाला क्लीन स्वीप करणार आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या केएल राहुलसाठी हा सामना आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी करो या मरोचा असणार आहे. रोहित शर्मा व्यतिरिक्त कुलदीप सेन आणि दीपक चहर देखील या शेवटच्या वनडेचा भाग असणार नाहीत. त्याचबरोबर कुलदीप यादवला भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

भारत: शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन/राहुल त्रिपाठी, केएल राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

बांगलादेश: नजमुल हुसेन शांतो, लिटन दास (कर्णधार), अनमुल हक, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम (यष्टिरक्षक), महमुदुल्लाह, अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, इबादत हुसेन, मुस्तफिजुर रहमान.