वनडेनंतर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारत आणि बांगलादेश आमनेसामने येणार आहेत. एकदिवसीय मालिकेत १-२ ने गमावल्यानंतर टीम इंडियाला कसोटीत धमाकेदार सुरुवात करायची आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल संघाची धुरा सांभाळणार आहे. राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक सामना खेळला. त्यात टीम इंडियाचा पराभव झाला. अशा परिस्थितीत राहुल त्याच्या नेतृत्वाखाली पहिला विजय मिळवेल.

भारत आणि बांगलादेश संघातील पहिला सामना झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर चट्टोग्राम येथे सकाळी साडेनऊला सुरु होणार आहे. आतापर्यंत भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध ११ कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये त्याने ९ विजय मिळवले असून २ सामने अनिर्णित राहिले. २०१५ नंतर भारतीय संघ बांगलादेशच्या भूमीवर कसोटी खेळणार आहे. भारताने बांगलादेशमध्ये शेवटचा विजय २०१० मध्ये नोंदवला होता.

या सामन्याच्या प्रक्षेपण आणि ऑनलाइन टेलिकास्टशी संबंधित सर्व माहिती –

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी कधी आहे?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना १४ डिसेंबरपासून म्हणजेच बुधवारपासून खेळवला जाणार आहे.

कसोटी सामना कोठे खेळवला जाईल?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चट्टोग्रामच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

सामना किती वाजता सुरु होणार –

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९.०० (नाणेफेक) वाजता खेळवला जाईल.

सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल?

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. सोनी स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर तुम्ही हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह हा सामना पाहू शकता.

फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह मॅच कशी बघायची?

या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग भारतात सोनी लिव्ह अॅपवर पाहता येईल.

पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघ –

बांगलादेश: नजमुल हसन शांतो, महमुदुल हसन जॉय, मोमिनुल हक, अनामूल हक, शकीब अल हसन (कर्णधार), लिटन दास, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, इबादत हुसेन, खालिद अहमद, शरीफुल इस्लाम, तस्किन अहमद , नुरुल हसन, यासिर अली, झाकीर हसन, रेझाउर रहमान राजा.

हेही वाचा – FIFA WC 2022: क्रोएशियाला हरवून अर्जेंटिना सहाव्यांदा अंतिम फेरीत; उपांत्य फेरीत अल्वारेझ चमकला, तर मेस्सीची जादू कायम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत: शुबमन गिल, केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, श्रीकर भरत, जयदेव, जयदेव नवदीप सैनी, अभिमन्यू इसवरन, सौरभ कुमार.