बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कसोटी संघात काही बदल केले आहेत. कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर पडला, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना संपूर्ण कसोटी मालिकेतून वगळण्यात आले. पहिल्या कसोटीत केएल राहुल संघाचा कर्णधार असेल, तर चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. ऋषभ पंतही कसोटी संघात आहे, पण त्याला यावेळी उपकर्णधार बनवण्यात आले नाही. यावरून चाहते चांगलेच संतापलेले दिसले. टीम इंडियामध्ये स्थिरता नसल्याने चाहते नाराज आहेत.

रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दुसऱ्या कसोटीत रोहितचे पुनरागमन होऊ शकते. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्याचवेळी बीसीसीआयने पुजाराला पहिल्या कसोटीत उपकर्णधार बनवल्यानंतर चाहते संतप्त झाले होते. क्रिकेट चाहते बीसीसीआयवर जोरदार टीका करत आहेत. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान जखमी झाला होता. दुखापतीमुळे त्याला कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातून बाहेर व्हावे लागले होते.

Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Ravindra Jadeja Earned Cricket Thalapathy Title From Chennai Super Kings
IPL 2024: रवींद्र जडेजाला CSKने दिलं स्पेशल नाव; थाला, चिन्ना थालासोबत आता चेन्नईच्या ताफ्यात ‘क्रिकेट थालापती’
Lucknow beat Gujarat by 33 runs in IPL 2024
LSG vs GT : लखनऊविरुद्धच्या पराभवानंतर शुबमन गिल संतापला; कोणावर फोडले खापर? घ्या जाणून

त्याचवेळी बीसीसीआयने रोहितच्या हकालपट्टीनंतर पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. बोर्डाच्या या संघात केएल राहुलला कर्णधार आणि चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. त्याचवेळी बीसीसीआयच्या या निर्णयामुळे चाहते संतापले आहेत. कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर पडला, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना संपूर्ण कसोटी मालिकेतून वगळण्यात आले. पहिल्या कसोटीत केएल राहुल संघाचा कर्णधार असेल, तर चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. ऋषभ पंतही कसोटी संघात आहे, पण त्याला यावेळी उपकर्णधार बनवण्यात आले नाही. यावरून चाहते चांगलेच संतापलेले दिसले. टीम इंडियामध्ये स्थिरता नसल्याने चाहते नाराज आहेत.

हेही वाचा: IND vs BAN: “फक्त सूर्यकुमार यादवला मिस्टर ३६० म्हणू नका”, भारताचा माजी फलंदाजाने केले धक्कादायक विधान

वास्तविक, पंतला उपकर्णधार बनवण्याची सर्वांनाच अपेक्षा होती. चाहते केएल राहुल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांना भारतीय संघाचा पुढचा कर्णधार मानतात. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड मालिकेदरम्यानही पंतकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अशा स्थितीत त्याला पुन्हा उपकर्णधार बनवले जाईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण बीसीसीआयने सर्वांना चकित करत बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी पुजाराला उपकर्णधार बनवले. त्यामुळे चाहते बीसीसीआयवर नाराज आहेत.

हेही वाचा: BCCI vs PCB: “भारताशिवायही आमचे क्रिकेट…” पीसीबी अध्यक्ष रमीज राजा पुन्हा बीसीसीआयवर भडकले

रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दुसऱ्या कसोटीत रोहितचे पुनरागमन होऊ शकते. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली. रोहित शर्माचा अंगठा निखळला आणि त्याला टाके घालावे लागले. त्या सामन्यात रोहित सलामीला येऊ शकला नाही. शेवटच्या षटकात फलंदाजी करताना त्याने २८ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या, तरीही भारताला विजय मिळवून देता आला नाही. विराट कोहलीच्या कर्णधारपदानंतर टीम इंडियामध्ये स्थैर्य नाही, कुणाचेही कर्णधारपद निश्चित दिसत नाही, असा संताप चाहत्यांनी व्यक्त केला.