India vs England 5th Test Match Updates : भारत आणि इंग्लंड संघातील मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाला भारतीय फिरकीपटूंनी २१८ धावांवर गुंडाळले. यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या दिवसखेर १ बाद १३५ धावा केल्या असून ८३ धावांनी पिछाडीवर आहे.

भारताच्या फिरकीसमोर इंग्लंडची दमछाक –

कर्णधार रोहित शर्मा ५२ धावांवर नाबाद असून शुबमन गिल २६ धावांवर नाबाद आहे. दोघांमध्ये ३१ धावांची भागीदारी झाली आहे. भारतीय संघाला एकमेव धक्का यशस्वी जैस्वालच्या रूपाने बसला. तो ५८ चेंडूत ५७ धावा करून बाद झाला. त्याला शोएब बशीरने यष्टिरक्षक बेन फॉक्सकरवी यष्टिचित केले. तत्पूर्वी, इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर आटोपला. कुलदीप यादवने पाच विकेट घेतल्या. त्याच वेळी, रविचंद्रन अश्विनने १०० वा कसोटी खेळताना चार विकेट घेतल्या. इंग्लंडकडून झॅक क्रॉऊलीने सर्वाधिक ७९ धावा केल्या. याशिवाय रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. इंग्लंडच्या सर्व १० विकेट्स भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या.

match prediction ipl 2024 royal challengers bangalore match against sunrisers hyderabad today
IPL 2024 : बंगळूरुसमोर विजयाचे आव्हान; सनरायजर्स हैदराबादशी आज गाठ; हेड, कोहलीकडून अपेक्षा
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव

रोहित-यशस्वीची पहिल्या विकेट्साठी १०४ धावांची भागीदारी –

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा संघ २१८ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी केली. यशस्वी जैस्वालने ५८ चेंडूत ५७ धावांची तुफानी खेळी केली. शोएब बशीरच्या चेंडूवर बेन फॉक्सने यशस्वी जैस्वालला यष्टिचित केले. पण रोहित शर्माने एका बाजूने फटकेबाजी सुरुच ठेवली.

हेही वाचा – IND vs ENG : यशस्वी जैस्वालने विराटला मागे टाकत रचला इतिहास, इंग्लंडविरुद्ध ‘हा’ पराक्रम करणारा पहिलाच खेळाडू

रोहित शर्माचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ५० षटकार पूर्ण –

रोहित शर्मापूर्वी महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनी भारतीय कर्णधार म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये १००० धावा केल्या होत्या. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस, न्यूझीलंडचा केन विल्यमसन आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांनी ही कामगिरी केली आहे. जागतिक क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त ६ कर्णधारांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये १००० धावा केल्या आहेत. याशिवाय रोहित शर्माने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वास्तविक, रोहित शर्माने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ५० षटकार पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला आशियाई फलंदाज ठरला आहे.