Shubman Gill Nike Jersey Controversy: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना बर्मिंघमहॅमच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ६०८ धावांचं भलंमोठं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला इंग्लंडचा संपूर्ण डाव अवघ्या २७१ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना ३३६ धावांनी आपल्या नावावर केला. हा भारतीय संघाचा बर्मिंघमहॅममध्ये मिळवलेला पहिलाच विजय ठरला आहे. याआधी भारतीय संघाने या मैदानावर एकही कसोटी सामना जिंकला नव्हता. त्यामुळे गिल अँड कंपनीसाठी हा सामना ऐतिहासिक ठरला आहे.

गिलने नायकी कंपनीची जर्सी घालणं, यात चुकीचं काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. अॅडीडास कंपनी हे भारतीय संघाचे जर्सी स्पॉन्सर आहे. बीसीसीआयने अॅडीडाससोबत करार केला आहे. त्यामुळे गिलने अॅडीडासची जर्सी परिधान करणे अपेक्षित होते. पण, त्याने सामन्यादरम्यान नायकीची जर्सी घातली आणि ते कॅमेऱ्यात कैद झालं. त्यामुळे कायदेशीर अडचण निर्माण होऊ शकते. नायकी आणि अॅडीडास या दोन्ही प्रतिस्पर्धी कंपन्या आहेत.

बीसीसीआयने २०२२ मध्ये अॅडीडाससोबत ५ वर्षांसाठी कायदेशीर करार केला आहे. असं असताना गिलने अॅडीडासच्या प्रतिस्पर्धी कंपनीचं टीशर्ट परिधान केलं. त्यामुळे बीसीसीआय त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकते. आता बीसीसीआय गिलवर काय कारवाई करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भारतीय संघाचा दमदार विजय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना कर्णधार शुबमन गिलने सर्वाधिक २६९ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने पहिल्या डावात ५८७ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर आटोपला. पहिल्या डावात भारतीय संघाने मोठी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावातही भारतीय संघाने ४२७ धावा करत डाव घोषित केला. यासह इंग्लंडसमोर विजयासाठी ६०८ धावांचं आव्हान ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव २७१ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना ३३६ धावांनी आपल्या नावावर केला.