IND vs ENG, India’s 5th Test Playing XI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ कोणत्या खेळाडूंसह उतरेल याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या सामन्यात भारतीय संघात फलंदाज करुण नायर याचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. चौथ्या कसोटीत अंतिम अकरात स्थान मिळालेला ऑल-राऊंडर शार्दुल ठाकूर याच्या जागी नायर याला संधी दिली जाऊ शकते.
वेगवान गोलंदाजांमध्ये देखील काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह आणि अंशुल कंबोज यांच्या जागी आकाशदीप आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी मिळू शकते, तर मोहम्मद सिराजला संघात कायम ठेवेले जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विकेट कीपर ऋषभ पंत दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी ध्रुव जुरेल याचा संघात समावेश केला जाईल. पंतच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने तो या कसोटी मलिकेतून बाहेर पडला आहे.
भारताने अशा प्रकारे संघाची निवड केली तर कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग एकही सामना न खेळता मायदेशी परतू शकतात. खेळपट्टीवर गवताचा थर असल्याने लेफ्ट-आर्म फिरकीपटू कुलदीप यादव याला संघात स्थान मिळू शकले नाही आणि याच कारणासाठी भारताने त्यांची फलंदाजी लाइनअप मजबूत केली आहे.
बुमराह खेळणार का?
सामन्याच्या आधल्या दिवशी बुमराह हा ओव्हल कसोटीमध्ये खेळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तो खेळला तर हा या मलिकेतील त्याचा चौथा सामना असेल. संघ व्यवस्थापनाने वर्क लोड विचारात घेत बुमराहला फक्त तीन समाने खेळवण्याचे नियोजन केले होते. पण तसे होताना दिसत नाहीये.
टीम मॅनेजमेंटने बुमराहला खेळवण्यापासून स्वतःला रोखल्यानंतर त्यांनी मोहम्मद सिराजत्या नेतृत्वाखाली युवा वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवले. पण पहिला कसोटी समाना गमावल्यानंतर जेव्हा प्रशिक्षक गौतम गंभीर याला विचारण्यात आले की कसोटी मालिकेचा निकाल जर अवलंबून असेल तर बुमराहला तीन ऐवजी चार सामने खेळवण्याबाबत विचार केला जाऊ शकतो का? यावर वर्क लोडबद्दल कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे गंभीरने स्पष्ट केले होते.
अशा परिस्थितीत भारताच्या गोलंदाजीचा भार हा सिराजच्या खांद्यावर असणार आहे. यापूर्वी बर्मिघम येथील कसोटी सामन्यात बुमराला संघातून वगळण्यात आले होते, या समन्यात सिराजने फक्त जबाबदारी घेतली नाही तर त्यांने दमदार कामगिरी देखील केली होती.
नायर याचा संघातील समावेश रंजक असणार आहे. नायर आणि साई सुदर्शन यांच्या समावेशामुळे तीसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण उतरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत साईला वगळण्यात आले, तेव्हा नायरने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. त्यानंतर साईला ओल्ड ट्रॅफर्ड येथील सामन्यात पुन्हा संघात स्थान देण्यात आले आणि नायरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले होते.
तीन स्पेशलिस्ट आणि दोन ऑल-राऊंडर – रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर- अशा पाच गोलंदाजांसह मैदैनात उतरेल. करुण नायरला संघात स्थान मिळण्याचे कारण शार्दुल ठाकूर याची कमकूवत गोलंदाजी आहे. मॅनचेस्टर सामन्यात शार्दुल फारसा प्रभाव टाकू शकला नव्हता, यामुळे एक खास फलंदाजाला संघात घेण्यात आले आहे.
इंग्लडने यापूर्वीच त्यांचा संघ जाहीर केला आहे, कर्णधार बेन स्टोक्सच्या खांद्याला जखमेमुळे तो संघातून बाहेर पडला आहे.