IND vs ENG 2nd T20I Match Updates: भारत वि इंग्लंड टी-२० मालिका भारतामध्ये खेळवली जात आहे. टी-२० मालिकेतील पहिलाच सामना झाल्यानंतर भारतीय संघाला धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या फिटनेसवर आधीच प्रश्नचिन्ह आहे, तर युवा सलामीवीर अभिषेक शर्माला दुसऱ्या टी-२० सामन्यात एक दिवस आधी सरावात दुखापत झाली. यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसले आहेत.

भारताचा युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. चेन्नईमधील सराव सत्रात नितीश रेड्डी २४ जानेवारीला दुखापत झाली. रेड्डी दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी भारताच्या टी-२० वर्ल्डकप संघाचा भाग असलेल्या शिवम दुबेला संघात संधी मिळाली आहे.

नितीश कुमार रेड्डीच्या जागी मुंबईचा फलंदाज अष्टपैलू शिवम दुबेचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुबे दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही कारण २५ जानेवारीला म्हणजेच दुसऱ्या टी-२० सामन्याच्या दिवशी मुंबईत रणजी करंडक सामना खेळत होता. त्यामुळे तो २८ जानेवारीला होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यापासून संघासाठी उपलब्ध असेल. शिवम दुबेला अशा वेळी संघात संधी मिळाली आहे, जेव्हा रणजी ट्रॉफी सामन्याच्या दोन्ही डावांत तो खाते न उघडता बाद झाला होता.

तर भारताचा विस्फोटक फलंदाज रिंकू सिंगला पहिल्या टी-२० सामन्यात खेळताना पाठदुखीचा त्रास झाला. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील सध्या याच दुखापतीने त्रस्त आहे. मात्र, रिंकू सिंगची दुखापत फारशी गंभीर नाही. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. पण या दुखापतीमुळे रिंकू सिंग दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-२० सामन्यातून बाहेर झाला आहे. रिंकूच्या जागी रमणदीप सिंगला संघात सामील करण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंडविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारताचा सुधारित संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रमणदीप सिंग.