scorecardresearch

Premium

World Cup 2023: रवींद्र जडेजाने मोडला अनिल कुंबळेचा विक्रम, विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेत टाकले मागे

R. Jadeja on Anil Kumble: या डावखुऱ्या फिरकीपटूने या विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्ध २ विकेट्स घेत एकूण १६ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. कोणत्याही भारतीय फिरकीपटूची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

IND vs NED: Ravindra Jadeja broke the World Cup record of Anil Kumble and Yuvraj Singh
रवींद्र जडेजाने अनिल कुंबळेचा विक्रम मोडला. सौजन्य- (ट्वीटर)

Ravindra Jadeja breaks Anil Kumble record: विश्वचषकाच्या ४५व्या आणि शेवटच्या साखळी सामन्यात भारताने नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव केला. या विजयासह त्याने गट फेरी अपराजित राहिली. टीम इंडियाने सर्व सामने जिंकले. आता १५ नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताचा उपांत्य सामना न्यूझीलंडशी होणार आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी एकूण १६ षटकार ठोकले. त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

२०२३ मध्ये वनडे फॉरमॅटमध्ये भारताच्या एकूण षटकारांची संख्या २१५ वर पोहोचली आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत टीम इंडिया अव्वल स्थानावर पोहोचली आहे. त्यांनी वेस्ट इंडिजचा विक्रम मोडला. विंडीजने २०१९ मध्ये २१५ षटकार मारले होते. या बाबतीत दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्या खेळाडूंनी २०२३ मध्ये 203 षटकार मारले आहेत. न्यूझीलंडने २०१५ मध्ये १७९ षटकार मारले होते. ऑस्ट्रेलियाने २०२३ मध्ये १६५ षटकार मारले आहेत.

AUS vs NZ 2nd T20I Highlights in marathi
AUS vs NZ : मॅक्सवेलने फिंचचा विक्रम मोडत रचला इतिहास, ऑस्ट्रेलियासाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
IND VS AUS U19 ICC (1)
U19 WC Final : कर्णधाराचा ‘तो’ निर्णय अन् भारताने विश्वचषक गमावला, मोहम्मद कैफने केलं पराभवाचं विश्लेषण
Pope and Bumrah Controversy in Ind vs ENG 1st Test Match
IND vs ENG : जसप्रीत बुमराहने ऑली पोपशी मुद्दाम पंगा घेतल्याने रोहितला करावी लागली मध्यस्थी, VIDEO होतोय व्हायरल
Joe Root broke Ricky Pontig's record with two runs in second innings
IND vs ENG 1st Test : जो रुटने अवघ्या दोन धावा करत रचला इतिहास, भारताविरुद्ध केला सर्वात मोठा विक्रम

जडेजाने अनिल कुंबळेचा विक्रम मोडला

नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजाने दोन विकेट्स घेतल्या. यासह विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स १६ घेणारा तो भारतीय फिरकी गोलंदाज ठरला आहे. त्याने या बाबतीत महान गोलंदाज अनिल कुंबळेचा विक्रम मोडला. कुंबळेने १९९६च्या वर्ल्ड कपमध्ये १५ विकेट घेतल्या होत्या. युवराज सिंगने २०११ मध्ये १५ विकेट्स घेतल्या होत्या. कुलदीप यादव त्याच्या जवळ पोहोचला आहे. सध्याच्या विश्वचषकात कुलदीपने १४ विकेट्स घेतल्या आहेत. मनिंदर सिंगने १९८७ मध्ये १४ विकेट्स घेतल्या होत्या.

हेही वाचा: ICC Hall of Fame: सेहवागच्या शिरपेचात मानाचा तुरा! आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करत केला गौरव, प्रथमच भारतीय महिलेचाही सन्मान

भारताने २००३ची कामगिरी मागे टाकली

या विश्वचषकात भारतीय संघाने सलग नऊ विजय मिळवले आहेत. २००३च्या कामगिरीत त्यांनी सुधारणा केली आहे. त्यांनी सलग आठ सामने जिंकण्याचा विक्रम मागे टाकला आहे. विश्वचषकात सलग सामने जिंकण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. २००३ आणि २००७ मध्ये त्यांनी ११ सामने जिंकले होते.

भारताने २५ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी केली

भारताने हा सामना जिंकला आणि २०२३ मध्ये २४ वा विजय मिळवला. त्यांनी एका कॅलेंडर वर्षात एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. भारताने यापूर्वी १९९८ मध्ये २४ सामने जिंकले होते. २०१३ मध्ये त्याने २२ सामने जिंकले होते.

विश्वचषकात हे तिसऱ्यांदा घडले

या सामन्यात भारताच्या नऊ खेळाडूंनी गोलंदाजी केली. केवळ के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी गोलंदाजी केली नाही. संघाचे वरिष्ठ खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनाही गोलंदाजीची संधी मिळाली. भारताकडून मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मोहम्मद शमीला या सामन्यात एकही यश मिळाले नाही.

हेही वाचा: Virat Kohli: नेदरलँड्सविरुद्धचा सामना संपताच विराट कोहली एकटाच परतला मुंबईत, विमानतळावरील Video व्हायरल

विश्वचषकात तिसऱ्यांदा एका संघाने नऊ गोलंदाजांचा वापर केला आहे. १९८७ मध्ये पहिल्यांदा पेशावरमध्ये श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडने नऊ खेळाडूंना गोलंदाजी करायला दिली होती. त्यानंतर १९९२ मध्ये क्राइस्टचर्चमध्ये पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंडने नऊ खेळाडूंनी गोलंदाजी केली होती. आता ३१ वर्षांनंतर भारताने ही कामगिरी केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs ned ravindra jadeja breaks anil kumbles record takes most wickets in world cup avw

First published on: 13-11-2023 at 16:52 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×