scorecardresearch

IND vs NZ 2nd T20: आज सूर्यकुमारच्या रडारवर असणार एबी डिव्हिलियर्सचा विक्रम; ‘हा’ कारनामा करण्याची सुवर्णसंधी

IND vs NZ 2nd T20 Updates: भारत आणि न्यूझीलंड संघात आज दुसरा टी-२० सामना खेळला जाणार आहे. सध्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवला एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडण्याची संधी असणार आहे.

IND vs NZ 2nd T20 Suryakumar Yadav
सूर्यकुमार यादव (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

सध्या भारत आणि न्यूझीलंड संघात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला असून दुसरा सामना आज खेळला जाणार आहे. हा सामना लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी ७ पासून रंगणार आहे. या सामन्यात स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवकडे एबी डिव्हिलियर्सचा एक विक्रम मोडण्याची संधी असणार आहे.

सूर्यकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात केवळ ४४ डावात १६२५ धावा केल्या आहेत. यासह सूर्यकुमार टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत टॉप-५ मध्ये सामील झाला आहे. मात्र, जर सूर्यकुमारने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ४७ धावा केल्या, तर तो या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सला मागे टाकेल. त्याचबरोबर सूर्यकुमारने यापूर्वी माजी कर्णधार एमएस धोनी आणि सुरेश रैना यांचा मागे टाकले आहे.

भारतासाठी टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत स्टार फलंदाज विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराटच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४००८ धावा आहेत. या यादीत रोहित शर्मा ३८५३ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल २२६५ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. शिखर धवन १७५९, एबी डिव्हिलियर्स १६७२ आणि सूर्यकुमार यादव १६२५ धावांसह या यादीत सामील आहेत. त्याचवेळी कुमारला डिव्हिलियर्सवर मागे सोडण्यासाठी फक्त ४७ धावांची गरज आहे.

हेही वाचा – WPL 2023: टायटल स्पॉन्सर हक्क विकण्यासाठी बीसीसीआयने मागविल्या निविदा; जाणून घ्या कशी असणार संपूर्ण प्रक्रिया?

भारतीय संघ: शुबमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, पृथ्वी शॉ, युझवेंद्र चहल, जितेश शर्मा , मुकेश कुमार.

न्यूझीलंड संघ: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), ईश सोधी, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, हेन्री शिपले, मायकेल रिप्पन, डेन क्लीव्हर, बेन लिस्टर.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 15:15 IST
ताज्या बातम्या