Sarfaraz Khan becomes third India batter to achieve unique feat in IND vs NZ Test : भारत आणि न्यूझीलंड याच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरु येथे खेळला जात आहे. रोहित-कोहलीनंतर सर्फराझ खान आणि ऋषभ पंत यांनी शानदार फलंदाजी केली. ऋषभ पंतचे शतक अवघ्या एका धावेने हुकले आणि तो ९९ धावा करून बाद झाला. मात्र, सर्फराझला त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावण्यात यश आले आणि त्याने १५० धावांची शानदार खेळी साकारली. सरफराजने बंगळुरू कसोटीत एक पराक्रम मोठा पराक्रम केला आहे, जो यापूर्वी १९९६ मध्ये भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नोंदवला गेला होता.

सर्फराझने उत्तम कामगिरी केली –

वास्तविक, पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात १५० धावा करणारा सर्फराझ हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. सर्फराझच्या आधी नयन मोंगियाने १९९६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही अनोखी कामगिरी केली होती. त्याच वेळी, १९५३ मध्ये माधव आपटेने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात १६३ धावांची नाबाद खेळी केली होती. उजव्या हाताचा फलंदाज सर्फराझने आपल्या खेळीत १८ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार ठोकले. सर्फराझने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ४२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. कसोटीच्या चौथ्या दिवशी सर्फराझने आपली उत्कृष्ट फलंदाजी सुरू ठेवत ११० चेंडूत पहिले कसोटी शतक झळकावले.

Kalidas hirve , Vasai National Marathon Competition,
वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Travis Head Fastest Century in Day Night Test Match IND vs AUS Adelaide Test
Travis Head: ट्रॅव्हिस हेडचे डे-नाईट कसोटीत सर्वात जलद शतक, स्वत:चा रेकॉर्ड मोडत केली मोठी कामगिरी; भारत बॅकफूटवर
Gus Atkinson Hattrick in Test First Bowler At Basin Reserve in New Zealand vs England Test
Gus Atkinson Hattrick: कसोटी हॅटट्रिक! गस अ‍ॅटकिन्सनने वेलिंग्टनमध्ये घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला गोलंदाज
Jasprit Bumrah becomes first bowler to pick 50 Test wickets in 2024 joins Kapil Dev Zaheer Khan in elite list
IND vs AUS: जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीची कमाल, २०२४ मध्ये कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज
Highest T20 Score by Baroda Team of 349 Runs in Syed Mushtaq Ali Trophy
Highest T20 Score: २० षटकांत ३४९ धावा! बडोद्याच्या संघाने रचला नवा विश्वविक्रम, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये रचला इतिहास
ZIM vs PAK 2nd T20I Sufyan Moqim break Umar Gul Records
ZIM vs PAK : २५ वर्षीय सुफियान मुकीमची कमाल! सातव्या सामन्यातच मोडला पाकिस्तानचा सर्वात मोठा विक्रम
Mohammad Amaan scores century off 106 balls against Japan
Mohammad Amaan : कर्णधार मोहम्मद अमानच्या वादळी शतकाच्या जोरावर भारताने उभारला धावांचा डोंगर, जपानसमोर ठेवले ३४० धावांचे लक्ष्य

एकाच कसोटीत शून्यावर बाद होणारे आणि दीड शतक झळकावणारे फलंदाज –

० आणि १६३* – माधव आपटे विरुद्ध वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन, १९५३
१५२ आणि ० – नयन मोंगिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दिल्ली, १९९६
० आणि १५० – सर्फराझ खान विरुद्ध न्यूझीलंड, बंगळुरू, २०२४

हेही वाचा – Rishabh Pant : ऋषभ पंत ठरला दुर्दैवी! अवघ्या एका धावेने हुकले ऐतिहासिक कसोटी शतक; स्टेडियमसह ड्रेसिंग रूममध्ये पसरली भयाण शांतता

भारतीय फलंदाजांचा मोठा पराक्रम –

सर्फराझ-पंतच्या उत्कृष्ट भागीदारीमुळे न्यूझीलंडने घेतलेली ३५६ धावांची आघाडी दूर करण्यात टीम इंडियाला यश आले. आपल्याच मातीत खेळत भारतीय संघाने दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या करत विरोधी संघाने घेतलेली आघाडी मोडून काढली. १९८५ मध्ये इंग्लंडने पहिल्या डावात ३८० धावांची आघाडी घेतली होती, जी भारताच्या फलंदाजांना संपवण्यात यश आले होते.

कोहली-पंतसोबत साकारली महत्त्वाची भागीदारी –

बंगळुरु कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहलीसह सर्फराझ खानने भारतीय डाव शानदारपणे हाताळला. कोहलीसह उजव्या त्याने तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली. कोहली बाद झाल्यानंतर सर्फराझने ऋषभ पंतसह चौथ्याला दिवसाच्या खेळाला सुरुवात करताना दमदार फटकेबाजी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शानदार फलंदाजी करत १७७ धावांची भागीदारी केली.

हेही वाचा – Sarfaraz Khan : ‘…सूरज अपने ही समय पर निकलेगा’, सर्फराझच्या वडिलांचे शब्द ठरले खरे, डेव्हिड वॉर्नरच्या पोस्टने जिंकली मनं

ऋषभ पंतनेही खूप फटकेबाजी केली आणि १०५ चेंडूत ९९ धावांची दमदार खेळी साकारली. पंतने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ५ षटकार मारले. याआधी विराट कोहलीनेही चांगली फलंदाजी करत ७० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर कर्णधार रोहित शर्माने ५२ धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारतीय संघाला दुसऱ्या डावात ४६२ धावा करता आल्या. न्यूझीलंडसाठी विल्यम ओ रुक आणि मॅट हेन्री यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. त्याचबरोबर एजाज पटेलने दोन विकेट्स घेतल्या. तसेच साऊदी आणि फिलिप्सने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Story img Loader