भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मुंबईत रंगणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबईतील क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या कसोटी दरम्यान वानखेडे स्टेडियममधील क्षमतेच्या २५ टक्के प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी महाराष्ट्र राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. ३ डिसेंबरपासून या सामन्याला सुरुवात होणार आहे

वानखेडे स्टेडियममध्ये ३०,००० प्रेक्षकांची क्षमता आहे. पीटीआयनुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “मुख्य सचिवांनी स्वाक्षरी केलेल्या महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार, वानखेडे कसोटीसाठी आत्तापर्यंत २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी आहे. आम्हाला ५० टक्के दर्शकांसाठी परवानगी देण्यात येईल अशी आशा आहे.” या स्टेडियमवर शेवटची कसोटी डिसेंबर २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध झाली होती. करोनामुळे गेल्या वर्षी क्रीडा क्रियाकलाप थांबवण्यात आल्याने या सामन्यामुळे वानखेडेवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमनही होईल.

हेही वाचा – VIDEO : बापरे..! पाकिस्तानच्या अंपायरसोबत घडली ‘गंभीर’ घटना; क्षेत्ररक्षकानं जोरात फेकला चेंडू अन्…

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूरमध्ये खेळला जात आहे. भारताने तिसऱ्या दिवशी सामन्यात शानदार पुनरागमन करत किवी संघाला २९६ धावांत गुंडाळले. भारताकडून अक्षर पटेलने ५ आणि अश्विनने ३ बळी घेतले. भारताने दुसऱ्या डावात आपल्या फलंदाजीला सुरुवात केली आहे.