टीम इंडिया मंगळवार, १० जानेवारीपासून आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ ची तयारी सुरू केली आहे. भारताने श्रीलंकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेपासून सुरुवात केली आहे. मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून सूर्यकुमार यादव आणि इशान किशनला वगळल्याने चाहते निराश झाले आहेत. त्याचबरोबर ते बीसीसीआय आणि रोहित शर्मावर राग व्यक्त करत आहेत.

सामन्यापूर्वी सोमवारी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनबाबत खुलासा केला होता, ज्यानंतर त्याला यूजर्सच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. रोहित शर्माने स्पष्टपणे सांगितले की, शेवटच्या एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगवान द्विशतक झळकावल्यानंतरही इशान किशनला प्रतीक्षा करावी लागेल. त्यानुसार त्याला आणि सूर्यकुमार यादवला पहिल्या सामन्यातून वगळले आहे.

Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Match Updates in Marathi
KKR vs LSG : कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी लखनऊच्या संघाने जर्सीचा रंग का बदलला? जाणून घ्या
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Gautam Gambhir Praises MS Dhoni
IPL 2024 CSK vs KKR : चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “धोनी हा एक कुशल…”
Mumbai Indians Vs Delhi Capitals Delhi Capitals Match Updates in Marathi
MI vs DC : रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करणारा विराट कोहलीनंतर ठरला दुसराच खेळाडू

रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही इशानला खेळवू शकणार नाही हे दुर्दैव आहे. गेल्या आठ-नऊ महिन्यांत आमच्यासाठी ज्या प्रकारे गोष्टी घडल्या आहेत. त्यानुसार एकदिवसीय सामन्यांमध्ये आमच्यासाठी ज्या प्रकारे परिस्थिती आहे, ते पाहता शुबमन गिलला संधी देणे योग्य ठरेल. त्याने त्या स्तरावर अत्यंत चांगली कामगिरी केली आहे.”

हेही वाचा – IND vs SL 1st ODI: एमएस धोनीचा ‘हा’ विक्रम मोडण्याची विराट कोहलीला सुवर्णसंधी; जाणून घ्या काय आहे विक्रम

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादव आणि इशान किशन प्लेइंग इलेव्हनचा भाग नसल्याचं रोहित शर्माच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले होते. त्यानंतर आज प्लेइंग इलेव्हन जाहीर केल्यानंतर या शिक्कामोर्तब झाला. रोहित शर्मा आणि बीसीसीयच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावरील यूजर्स चांगलेच संतापले आहेत.

शेवटच्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारा इशान किशन आणि श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात नाबाद शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश न केल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासाठी यूजर्स केएल राहुलला जबाबदार धरत आहेत. या सामन्यात इशान किशनला यष्टिरक्षण करायला हवे, जेणेकरून इशान आणि सूर्या या दोघांचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश होऊ शकला असता, असे युजर्सचे म्हणणे होते.

हेही वाचा – IND vs SL 1st ODI: सचिन तेंडुलकरच्या ‘या’ विश्वविक्रमावर विराट कोहलीची असणार नजर; श्रीलंकेविरुद्ध करू शकणार का कमाल?

संघ निवडीवरून रोहित शर्मावर टीका होत आहे.

सूर्यकुमार यादवला खेळवायला हवे होते, असे चाहते म्हणत आहेत. कारण त्याच्यामुळे ते पुन्हा सामने पाहू लागले आहेत.

सूर्यकुमार यादवला वगळल्याबद्दल यूजर्स टीम इंडियालाही टोमणे मारत आहेत.

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, उमरान मलिक, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.