भारत आणि श्रीलंका संघांत वनडे मालिकेतील पहिला सामना आज गुवाहाटी येथे खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २३.१ षटकांत २ बाद १७३ धावा केल्या. दरम्यान रोहित शर्माचे वनडेतील तिसावे शतक अवघ्या १७ धावांनी हुकले.

श्रीलंका विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात रोहित शर्मा आणि शुबमन गिलने भारताच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी भारतीय संघाला शानदार सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी १४३ धावांची भागीदारी रचली. यानंतर शुबमन गिल ७० धावा करुन बाद झाला.

त्याला दासुन शनाकाने पायचित केले. शुबमन गिलने ६० चेंडूचा सामना करताना ११ चौकारांच्या मदतीने ७० धावांचे योगदान दिले.रोहित शर्माने ६७ चेंडूचा सामना करतान ८३ धावा केल्या. ज्यामध्ये त्याने ९ चौकार ३ षटकार लगावले. त्याला दिलशान मदुशंकाने बाद केले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन:

हेही वाचा – IND vs SL 1st ODI: सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने संतापले चाहते; म्हणाले, ‘बीसीसीआय आणि रोहित शर्मा फक्त…’

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, उमरान मलिक, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीलंका: पाथुम निशांका, कुशल मेंडिस (विकेटकीपर), अविष्का फर्नांडो, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, दासुन शानाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेलाल्गे, कसून रजिथा, दिलशान मदुशंका.