भारत आणि श्रीलंका यांच्यातील एक रोमांचाक सामना मंगळवारी (१० जानेवारी) चाहत्यांना पाहायला मिळाला. भारताने हा सामना ६७ धावांच्या मोठ्या अंतराने जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. सामन्याच्या शेवटच्या षटकात मोहम्मद शमी गोलंदाजीसाठी आला. श्रीलंकन कर्णधार दासुन शनाका शतकीय खेळीपासून अवघ्या दोन धावा दुर असताना शमीने त्याला जवळपास बाद केलेच होते. पण रोहितच्या एका निर्णयामुळे शनाकाची विकेट वाचली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही घटना श्रीलंकेच्या डावातील शेवटच्या षटकातील आहे. तिसरा चेंडू टाकण्यापूर्वी मोहम्मद शमीने नॉन-स्ट्रायकर एंडला दासुन शनाकाला धावबाद केले. अंपायर नितीन मेनन यांनी ते थर्ड अंपायरकडे पाठवले. त्यानंतर रोहित शर्माने मोहम्मद शमीशी बोलून अपील मागे घेण्यास सांगितले. हे तुम्ही या बातमीतील खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता.

शेवटच्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी मोहम्मद शमी धावात आला. त्यावेळी स्ट्राईकवर कसून रजिथा (०) होता, पण शमीने हा चेंडू फलंदाजाच्या दिशेने टाकण्याआधीच नॉन स्ट्राईकवरील शनाकाला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. शमीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण शनाका त्यावेळी शतकापासून अवघ्या दोन धावा दूर होता. शमीने शनाकाच्या विकेटसाठी पंचांकडे अपील केली, पण तितक्यात कर्णधार रोहित शर्मा याने शमीला अपील मागे घेण्यास सांगितले. रोहितच्या या निर्णयावर चाहत्यांकडून समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींच्या मते रोहितचा निर्णय बरोबर होता, तर काहींच्या मते रोहितने शमीला अपील मागे घेण्यास सांगणे, चुकीचे होते.

दासुन शनाकाने ८८ चेंडूत १०८ धावांची शतकी खेळी केली

दरम्यान, रोहितच्या सांगण्यावरून शमीने आपील मागे घतेली, ज्याचा फायदा शनाकाने पुरेपूर उचलला. शनाकाने शेवटच्या दोन चेंडूंवर अनुक्रमे चौकार आणि शटकार कुटत स्वतःचे शतक पूर्ण केले. शनाकाने ८८ चेंडूत नाबाद १०८ धावा केल्या. त्याच्या या शतकाच्या जोरावर श्रीलंकन संघ ८ बाद ३०६ धावांपर्यंत मजल मारू शकला. सलामीवीर पाथुम निसांका याने देखील ७२ धावांची महत्वपूर्ण खेळी केली.

रोहित शर्माने दिले यावर उत्तर

नॉन स्ट्रायकरच्या शेवटी मोहम्मद शमी धावबाद झाल्यानंतर मैदानी पंच टीव्ही पंचाकडे गेले, पण भारतीय कर्णधार रोहित शर्माने अपील मागे घेतले. शमीने दासन शनाकाला धावबाद केले तेव्हा तो ९८ धावांवर खेळत होता. रोहित शर्माच्या माध्यमातून अपील मागे घेतल्यानंतर शनाकानेही आपले शतक पूर्ण केले. विस्डेन इंडियाच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा म्हणाला, “मला माहित नव्हते की शमीने असे केले आहे, तो ९८ धावांवर खेळत होता, आम्ही त्याला अशा प्रकारे बाहेर काढू शकत नाही, आम्हाला त्याने जसे केले तसे बाहेर काढायचे होते.”

हेही वाचा: Prithvi Shaw: पठ्ठ्याचा नाद करायचा नाय! ‘त्रिशतकवीर’ पृथ्वी शॉचा शो सुरूच, बीसीसीआय निवड समितीला दिले सडेतोड उत्तर

श्रीलंकन खेळाडूंकडून कौतुकाचा वर्षाव

श्रीलंकेच्या अनेक माजी दिग्गज खेळाडूंकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यात धडाकेबाज फलंदाज सनथ जयसूर्या, अट्टापट्टू यांनी कौतुक केले. अँजेलो मॅथ्यूजने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, “बरेच कर्णधार असे करतील पण रोहित शर्माने मनं जिंकली. अपील मागे घेतल्याबद्दल @ImRo45 ला सलाम! चांगल्या खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन.” तर सनथ जयसूर्या यांनी देखील हिटमॅनच्या निर्णयाला दाद दिली. “रोहित शर्माने धावबाद करण्यास दिलेला नकार आणि दाखवलेली खिलाडीवृत्ती त्यामुळे तो खरा विजेता होता”, असे जयसूर्या यांनी म्हटले.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl 1st odi such is sportsmanship sri lankan stalwarts showered praise on rohits action indian pride avw
First published on: 11-01-2023 at 14:03 IST