IND vs SL, Virat Kohli helicopter shot: विराट कोहलीसाठी रविवारचा दिवस खूप चांगला होता. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरे शतक ठोकले आणि ११० चेंडूत १६६ धावांची नाबाद खेळी खेळून आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४६वे शतकही ठोकले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण ७४वे शतक ठरले. या खेळीदरम्यान विराट कोहलीने एकूण ८ षटकार ठोकले, ज्यामध्ये धोनी शैलीतील हेलिकॉप्टर षटकारचाही समावेश आहे. विराटने जेव्हा हेलिकॉप्टर शॉट मारला तेव्हा तो स्वतः म्हणाला, “माही शॉट.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विराट कोहलीने भारतीय डावातील ४४व्या षटकात कसून राजिथाच्या चेंडूवर हा षटकार मारला. किंग कोहली षटकार मारण्यासाठी क्रीजच्या बाहेर आला आणि चेंडूपर्यंत पोहोचल्यानंतर त्याने पिच ऑफ द जाऊन शॉट खेळला आणि त्या चेंडूला लाँग ऑनच्या दिशेने पाठवले. विराटचा हा शॉट हेलिकॉप्टर प्रकारातील होता, जो ९७ मीटर अंतरावर पडला. यानंतर, जेव्हा तो स्टेडियममध्ये बसलेल्या लोकांकडून या शॉटचे कौतुक होत होते, तेव्हा त्याच्या शॉटबद्दल बोलत असताना तो त्याचा सहकारी फलंदाज श्रेयस अय्यरकडे गेला आणि त्याने हसून त्याला सांगितले की, “मी नाही तर माहीने शॉट मारला असे मला वाटले कारण, हा तर माही शॉट!”

Sourav Ganguly's Reaction to Rohit's Leadership
Sourav Ganguly : “…म्हणून मी रोहित शर्माला कर्णधार बनवलं होतं”, सौरव गांगुलीचा ‘हिटमॅन’बद्दल मोठा खुलासा
Sourav Ganguly Reacts After Sunil Gavaskar Called Dhruv Jurel The Second Rising MS Dhoni
Sourav Ganguly : ‘माही’भाईशी जुरेलची तुलना होताच ‘दादा’ची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनीला धोनी बनण्यासाठी…”
Pakistani Singer Shazia Manzoor Slaps Co host on Live Show
पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ
Fact check on pm Narendra Modi waving hand to fish viral video
सुदर्शन सेतू उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदींनी ‘माशांना’ दाखवला हात? जाणून घ्या, व्हायरल Video मागील सत्य

विराटच्या बोलण्याचं हे लिप सिंकिंग कॅमेऱ्यात कैद झालं आणि आता या शॉटसोबत त्याच्या लिप-सिंकिंगच्या आणि त्याच्या माहीच्या शॉटच्या अनेक क्लिप सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. विराट कोहली (१६६*) आणि शुबमन गिल (११६) यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारताने श्रीलंकेसमोर ३९० धावांचे आव्हान ठेवले आहे. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ अवघ्या ७३ धावांत गारद झाला आणि ३१७ धावांच्या मोठ्या फरकाने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात मोठा विजय

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पाहुण्या संघाचा धुव्वा उडवला. गेल्या अनेक सामन्यांपासून सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्ये शानदार गोलंदाजी करणाऱ्या सिराजने पुन्हा एकदा पहिल्या पॉवरप्लेमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली. पहिल्या पाच षटकांत त्याने ४ विकेट्स घेतल्या. दहा षटकांत ३९ धावांत पाच गडी गमावल्यानंतर श्रीलंकेचा संघ सामन्यातून पूर्णपणे बाद झाला. सिराजशिवाय मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी दोन विकेट घेतल्यामुळे श्रीलंकेचा संघ २२ षटकात ७३ धावांवर सर्वबाद झाला.

हेही वाचा: IND vs SL 3rd ODI: चतुर-चलाख मोहम्मद सिराजशी पंगा घेणं पडलं महागात; करुणारत्नेची एक चूक…अन् दांडी गुल, Video व्हायरल

एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठे विजय भारत – ३१७ वि. श्रीलंका, २०२३ न्यूझीलंड – २९० वि. आयर्लंड, २००८ ऑस्ट्रेलिया – २७५ वि. अफगाणिस्तान, २०१५ दक्षिण आफ्रिका – २७२ वि. झिम्बाब्वे, २०१० दक्षिण आफ्रिका – २५८ वि. श्रीलंका, २०१२