भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. या मालिकेतील निर्णायक सामना ७ जानेवारी रोजी होणार आहे. दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताला १६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात अक्षर पटेलने भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सातव्या क्रमांकावर खेळताना एक मोठा विक्रम केला आहे. ज्यामध्ये त्याने रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्याल मागे टाकले आहे.

२०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने एका टप्प्यावर ५७ धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. टीम इंडिया हा सामना लाजिरवाण्या पद्धतीने हरेल असे वाटत होते, पण सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी मिळून भारताला लाजिरवाण्या पराभवापासून वाचवले. तसेच शेवटपर्यंत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. या सामन्यात अक्षर पटेलने ३१ चेंडूत ६५ धावा केल्या. तो सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सातव्या क्रमांकावर खेळणाऱ्या कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

याआधी, सातव्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर खेळताना, रवींद्र जडेजाने २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतासाठी सर्वोच्च धावसंख्या नोंदवली होती. तेव्हा जडेजा ४४ धावा करून नाबाद परतला होता. यानंतर २०२२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ४१ धावा करणाऱ्या दिनेश कार्तिकचे नाव येते.

हेही वाचा – Rishabh Pant Health Updates: फक्त आयपीएलच नव्हे, तर ‘या’ मोठ्या स्पर्धेलाही मुकणार पंत; जाणून घ्या कधी करणार पुनरागमन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर धोनी आहे, ज्याने २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३८ धावा केल्या होत्या. अक्षर पटेल हा सातव्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अर्धशतक करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. अक्षरने या खेळीत ३ चौकार आणि ६ षटकार लगावले.