India vs West Indies 2nd ODI Match Updates: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ३ वनडे मालिकेतील दुसरा सामना बार्बाडोस येथे खेळवला जात आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळत नाहीत. त्याचवेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जागी संजू सॅमसन आणि अक्षर पटेलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. मात्र, रोहित-विराटशिवाय टीम इंडियाची फलंदाजी अपयशी ठरली आहे. टीम इंडियाने इशान किशनच्या अर्धशतकाच्या जोरावर ४०.५ षटकांत सर्वबाद १८१ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्ड आणि गुडाकेश मोतीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या

इशान किशनने झळकावले अर्धशतक –

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने चांगली सुरुवात केली. सलामीवीर इशान किशन आणि शुबमन गिल यांनी चांगली सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १६.५ षटकात ९० धावा जोडल्या. पण यानंतर भारतीय टॉप ऑर्डरचे फलंदाज एका पाठोपाठ बाद झाले. भारतीय संघाला पहिला धक्का ९० धावांच्या धावसंख्येवर बसला. शुबमन गिल ३४ धावा काढून बाद झाल्या. त्याच्यानंतर अर्धशतकवीर इशान किशनही बाद झाला. इशान किशनने ५५ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. त्याने या खेळी दरम्यान ६ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याला १८व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रोमॅरियो शेफर्डने अॅलिक अथानाझच्या हाती झेलबाद केले.

यानंतर भारतीय संघाच्या फलंदाजांची चांगलीच तारांबळ उडाली. अवघ्या ११३ धावांवर आघाडीचे ५ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. ज्यामध्ये संजू सॅमसन (९), हार्दिक पांड्या (७), सूर्यकुमार यादव (२४), अक्षर पटेल (१) आणि रवींद्र जडेजा (१०) सारखे पहिल्या फळीतील फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर शेवटच्या फळीत शार्दुल ठाकुरने १६ धावा केल्या.

हेही वाचा – KPL 2023: ६,६,६,६,६,६,६…सेदिकुल्लाह अटलचा कहर! एकाच षटकात कुटल्या ४८ धावा, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुकेश कुमार १०व्या विकेटच्या रुपाने ६ धावांवर बाद झाला, तर कुलदीप यादव ८ धावांवर नाबाद राहिला. भारतीय संघाने ४०.५ षटकांत सर्वबाद १८१ धावा केल्या.वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्ड आणि गुडाकेश मोतीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.त्याचबरोबर अल्झारी जोसेफने २, तर कायल मेयर्सशिवाय प्रत्येक गोलंदाजाने एक विकेट घेतली