scorecardresearch

Premium

India Tour of West Indies : भारतीय क्रिकेटपटूंची शाही बडदास्त; एका फ्लाईटसाठी बीसीसीआयने खर्च केले तब्बल ३.५ कोटी रुपये

Team India Chartered Flight : इंग्लंडमधील एकदिवसीय मालिका संपल्यानंतर मँचेस्टरहून भारतीय संघाने पोर्ट ऑफ स्पेनसाठी फ्लाईट घेतली होती.

Team India Chartered Flight
फोटो सौजन्य – ट्विटर

एकदिवसीय आणि टी २० क्रिकेट मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ वेस्ट इंडीजमध्ये दाखल झाला आहे. इंग्लंडमधील एकदिवसीय मालिका संपल्यानंतर मँचेस्टरहून भारतीय संघाने पोर्ट ऑफ स्पेनसाठी फ्लाईट घेतली होती. भारतीय संघाचा या १० तासांच्या विमानप्रवासाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एका चार्डर्ड फ्लाईटसाठी तब्बल ३.५ कोटी रुपये खर्च केले आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाने बीसीसीआय सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने मँचेस्टर ते पोर्ट ऑफ स्पेन या 10 तासांच्या प्रवासासाठी भारतीय खेळाडूंसाठी एक चार्टर्ड फ्लाईट बुक केली होती. या फ्लाईटमध्ये खेळाडूंसोबत त्यांच्या पत्नी आणि मैत्रिणींनीदेखील प्रवास केला.

IND vs ENG 4th Test Match Updates in marathi
IND vs ENG 4th Test : इंग्लंडला मोठा धक्का! ‘या’ स्टार गोलंदाजाने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून घेतली माघार
England have named our XI for the fourth Test in RanchI
IND vs ENG : चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन जाहीर! वूड-अहमदच्या जागी ‘या’ दोन खेळाडूंना मिळाली संधी
Wasim Jaffer Advice to Indian Team
IND vs ENG : “गिल-जैस्वालने सलामी द्यावी अन् रोहितने…”, माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाला दिला बॅटिंग ऑर्डरबाबत सल्ला
U19 World Cup 2024 fastest fifty record
U19 World Cup 2024 : ६,६,६,६,४,६…दक्षिण आफ्रिकेच्या स्टीव्ह स्टॉकने ऋषभ पंतचा विक्रम मोडत रचला इतिहास

सूत्राने असेही सांगितले की, “सामान्यत: कमर्शियल फ्लाईटसाठी कमी खर्च आला असता. मँचेस्टर ते पोर्ट ऑफ स्पेन या बिझनेस क्लासच्या तिकिटाची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे. तुलनेत चार्टर्ड फ्लाईट अधिक महाग आहे. मात्र, एका कमर्शिअल फ्लाईटमध्ये २५ पेक्षा जास्त तिकिटे आरक्षित करणे कठीण आहे. भारतीय संघात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांसह १६ खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय काही खेळाडूंच्या पत्नी आणि मैत्रीणी सोबत आहेत.”

हेही वाचा – धो-धो पाऊस पडत असूनही भारतीय संघाने घेतली नाही माघार; त्रिनिदादमध्ये ‘अशा’ प्रकारे केला सराव

वेस्टइंडीज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रवाना झालेला भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दिपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार) शार्दुल ठाकुर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs wi bcci spent three and half crore rupees for team india chartered flight vkk

First published on: 21-07-2022 at 13:23 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×