भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात केवळ चार चेंडू खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. पण त्याआधीच त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम करणारा विराट कोहली आता जगातील पहिला फलंदाज बनला आहे, ज्याने भारतातच ५००० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेस्ट इंडिजविरुद्ध विराट कोहली चार चेंडूत आठ धावा करून बाद झाला, मात्र दुसरा चौकार मारताच भारतीय मैदानावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. विराट कोहलीने ९६ व्या डावात हा पराक्रम केला, तर याआधी हा विश्वविक्रम मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.

सचिन तेंडुलकरने घरच्या मैदानावर १२० डावात ५००० वनडे धावांचा टप्पा पार केला होता. आपल्या भूमीवर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. सचिनने भारतात एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६९७६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रिकी पॉन्टिंग ५४०६ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने ऑस्ट्रेलियात हा पराक्रम केला आहे. याशिवाय जॅक कॅलिसने दक्षिण आफ्रिकेत १३५ डावात ५१७८ धावा केल्या आहेत.

दरम्यान, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात फलंदाज रोहित शर्माने जोरदार फलंदाजी केली. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नियमित कर्णधार म्हणून रोहित शर्माचा हा पहिलाच सामना होता. मात्र, याआधीही त्याने १० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय सघांचे कर्णधारपद भूषवले आहे.

रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ४२ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४४ वे अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याचा स्ट्राइकरेट ११९ होता. मात्र, आणखी १० धावा जोडून तो बाद झाला. त्याने ५१ चेंडूत १० चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६० धावा केल्या. हिटमॅन रोहितला अल्झारी जोसेफने एलबीडब्ल्यू आऊट केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi virat kohli fastest batsman to score 5000 odi runs at home ground abn
First published on: 06-02-2022 at 19:40 IST