IND vs ENG Highlights: टी २० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात आज टीम इंडियाचा दारुण पराभव झाला आहे. संपूर्ण विश्वचषकात टॉपला टिकून असणारा भारतीय संघ इंग्लंडच्या फलंदाजांसमोर अक्षरशः मोडून पडला. भारताने दिलेल्या १६९ धावांच्या आव्हानाचा सामना करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनीच भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. १० गडी राखून इंग्लंडने रोहित शर्माच्या संघाचा पराभव केला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना, विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न व या स्पर्धेतील भारताचे आव्हान आज संपुष्टात आले आहे.

आज भारताच्या पराभवात एक अत्यंत दुर्दैवी योग जुळून आला आहे. यापूर्वी भारताला टी २० विश्वचषकाच्या सामन्यातून अशाच प्रकारे न्यूझीलँडने बाहेर काढले होते तर मागील वर्षी पाकिस्तानने सुद्धा अशाच प्रकारे १० गडी राखून भारताचा पराभव केला होता. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ हा सर्वात यशस्वी संघ ठरला होता, दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सामन्याचा वगळता भारताने आतापर्यंतचा प्रत्येक सामना जिंकला होता. ज्यावेळी न्यूझीलंडने भारताला विश्वचषकातून उपांत्य फेरीतच बाहेर काढलं त्यावेळेसही असाच योगायोग जुळून आला होता.

यापूर्वी २०२१ मध्ये आयसीसी विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातही भारताला मोहम्मद रिझवान व बाबर आझम यांच्या भागीदारीसमोर पराभव पत्करावा लागला होता, दुर्दैवाने यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानने दहा गडी राखून केलेला पराभव व न्यूझीलंडने विश्वचषकातून बाहेर काढल्याचा चटका एकत्रित इंग्लंडच्या रूपात भारतीयांना सहन करावा लागला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

IND vs ENG हायलाईट्स

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने तुफान फटकेबाजी करत संघाला १६८ ची धावसंख्या उभारण्यास मदत केली होती, विराट कोहलीने सुद्धा या सामन्यात अर्धशतक पूर्ण केले. मात्र इंग्लंडच्या सामन्यासाठी आजचा १६९चं लक्ष्य फार मोठं नव्हतं. शिवाय भारतीय गोलंदाजांना सुरुवातीपासूनच इंग्लंडचे सामानावीरांच्या चौकार षटकारांचा सामना करावा लागला. याच टप्प्यात आत्मविश्वास गमावल्याने ताण वाढू लागला व परिणामी भारताला १० गडी राखून इंग्लंडने पराभूत केले आहे.