भारतीय संघाचा इंग्लंड दौरा सुरु होण्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्ध मर्यादीत षटकांच्या सामन्यांमधून माघार घ्यावी लागली आहे. आयर्लंडविरुद्ध टी-२० सामन्यादरम्यान बुमराहच्या बोटाला फ्रॅक्चर झालं आहे. तर दुसरीकडे फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला सरावादरम्यान दुखापत झाल्यामुळे त्यालाही संघातून आपली जागा गमवावी लागणार आहे.

३ जुलैपासून भारताच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. सर्वात प्रथम भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने दोघांच्या जागी कृणाल पांड्या आणि दिपक चहर यांची संघात निवड करण्यात आलेली आहे. याचसोबत वॉशिंग्टन सुंदरची भारताच्या वन-डे संघातही निवड झालेली आहे. बीसीसीआयने या संघात सुंदरच्याजागी अक्षर पटेलची निवड केली आहे.

भारताचा टी-२० संघ –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सुरेश रैना, मनिष पांडे, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव, दिपक चहर.

भारताचा वन-डे संघ –

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव