India vs Australia 1st T20I Live Score Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना आज २९ ऑक्टोबर रोजी कॅनबेरामध्ये होत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ खेळेल. तर मिचेल मार्श ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्त्व करताना दिसणार आहे. वनडे मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघ टी-२० मालिका आपल्या नावे करण्याच्या तयारीत मैदानावर उतरले आहेत.
IND vs AUS 1st T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिल्या टी-20 सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
IND vs AUS Live: पावसाची पुन्हा हजेरी
१०व्या षटकातील चार चेंडू झाल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. त्यामुळे सामना थांबवण्यात आला आहे. तोपर्यंत टीम इंडियाने ९.४ षटकांत १ बाद ९८ धावा केल्या आहेत. पाऊस जोरदार आल्याने पुन्हा एकदा षटकं कमी होण्याची शक्यता आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादवने नॅथन एलिसच्या १०व्या षटकात सलग ३ चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवले आहेत. पहिल्या दोन चेंडूंवर चौकार लगावत त्याने एलिसची लाईन लेंग्थ बिघडवली. यानंतर एलिसने वाईड चेंडू टाकला. त्यानंतर पुढच्या लीगल तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. यासह सूर्याच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची बोलती बंद झाली आहे. यासह सूर्याने २४ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३७ धावा केल्या आहेत.
पावसाच्या विश्रांतीनंतर सामन्याला पुन्हा सुरूवात झाली आहे. भारताने यासह ६ षटकांत ५३ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव व शुबमन गिलची जोडी मैदानावर आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिला टी-२० सामन्यात पावसाने गोंधळ घातला आहे. या पावसामुळे सामना बराच वेळ थांबला. त्यामुळे आता सामन्याची षटकं कमी करण्यात आली आहे. यासह आता १८ -१८ षटकांचा सामना खेळवला जाणार आहे, तर पॉवरप्ले ५.२ षटकांचा होईल. भारतीय वेळेनुसार सामना ३ वाजता पुन्हा सुरू होणार आहे.
५ षटकांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना अचानक थांबवण्यात आला. कॅनबेरामध्ये होत असलेल्या या सामन्यात पावसाने हजेरी लावली आहे आणि यामुळेच सामना थांबवण्यात आला आहे.
IND vs AUS 1st T2OI live: सूर्यकुमार यादवचा ट्रेड मार्क शॉट
सूर्यकुमार यादवच्या फॉर्मवर आणि धावांवर सर्वांच्या नजरा असतानाच सूर्याने मैदानावर येताच हेझलवूडच्या गोलंदाजीवर त्याच्या ट्रेडमार्क शॉट म्हणजेच फ्लिक करत षटकार त्याने खेचला. यासह भारताने ५ षटकांत १ बाद ४३ धावा केल्या आहेत.
भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माच्या रूपात टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. अभिषेक शर्मा चौथ्या षटकात नॅथन एलिसच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. अभिषेक ४ चौकारांसह १९ धावा करत बाद झाला.
भारताचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी चांगली सुरूवात केली आहे. अभिषेकने पहिल्याच षटकात चौकार लगावला आणि त्यानंतर पुढच्या षटकात त्याने बार्टलेटला दोन चौकार लगावले. तर गिलनेही त्याला चांगली साथ दिली. यासह टीम इंडियाने ३ षटकांत बिनबाद २६ धावा केल्या.
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
IND vs AUS live: ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन
मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टॉइनिस, जोश फिलिप, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना आज खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. भारताचा अष्टपैलू खेळाडू नितीश रेड्डी पहिल्या तीन सामन्यांमधून दुखापतीमुळे बाहेर झाला आहे, अशी अपडेट बीसीसीआयने दिली आहे.

