India vs England 4th Test, Day 4 Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये सुरू आहे. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे हा सामना जिंकणं भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे. मात्र, या सामन्यातही भारतीय संघ पिछाडीवर असल्याचं दिसून येत आहे. या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. सामन्यातील तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना इंग्लंडने ७ गडी बाद ५४४ धावा केल्या आहेत. यासह इंग्लंडने १८६ धावांची आघाडी घेतली आहे.
जो रूटचं विक्रमी शतक, इंग्लंड ५०० पार
इंग्लंडकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना जॅक क्रॉलीने ८४, बेन डकेटने ९४, ओली पोपने ७१, जो रूटने १५० धावांची खेळी केली. तर बेन स्टोक्स नाबाद ७७ धावांवर माघारी परतला. इंग्लंडचा संघ आणखी मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
चौथ्या दिवशी काय घडणार?
सामन्यातील तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना इंग्लंडने ५०० धावांचा डोंगर सर केला. इंग्लंडचे ७ फलंदाज तंबूत परतले आहेत. त्यामुळे चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाज इंग्लंडचा डाव संपवून मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.
भारतीय संघाला चौथ्या दिवशी पहिलं यश
भारतीय संघाला चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच मोठं यश मिळालं आहे. जसप्रीत बुमराहने वेगवान चेंडू टाकून डॉसनला बाद करत माघारी धाडलं आहे.
बेन स्टोक्सचं शतक पूर्ण! कसोटी क्रिकेटमध्ये नोंदवला मोठा विक्रम
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना बेन स्टोक्सने १६४ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं आहे. या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने ५ गडी बाद केले होते. यासह त्याने एकाच सामन्यात शतक आणि ५ गडी बाद करण्याचा विक्रम नोंदवला आहे.
भारतीय संघाला पहिल्याच षटकात २ मोठे धक्के!
भारतीय संघाला पहिल्याच षटकात २ मोठे धक्के बसले आहेत. ख्रिस वोक्सच्या पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन बाद होऊन माघारी परतला आहे.
शुबमन गिल- केएल राहुलची दमदार खेळी
या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पहिल्याच षटकात २ मोठे धक्के बसले. यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन शून्यावर माघारी परतले. भारतीय संघाला खातंही उघडता आलं नव्हतं. मात्र, त्यानंतर केएल राहुल आणि शुबमन गिलने मिळून १७४ धावा केल्या आहेत. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी १७४ धावा केल्या आहेत. केएल राहुल ८७ धावांवर नाबाद आहे. तर शुबमन गिल ७८ धावांवर नाबाद आहे. त्यामुळे या दोन्ही फलंदाजांना पाचव्या दिवशी शतक झळकावण्याची संधी असणार आहे. इंग्लंडकडे अजूनही १३७ धावांची आघाडी आहे.