India vs England Test Series Schedule: आयपीएल २०२५ दरम्यान भारताच्या इंग्लंड दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू होती. इंग्लंडची कसोटी मालिका पुढील महिन्यात असतानाच आधी रोहित शर्मा आणि त्यानंतर विराट कोहली यांनी कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे आता भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी नव्या खेळाडूच्या खांद्यावर येणार होती, याशिवाय कसोटी संघातही मोठे बदल पाहायला मिळत आहेत.

अजित आगरकरांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली. टीम इंडियाचा युवा खेळाडू शुबमन गिलच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ऋषभ पंत भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. तर शार्दुल ठाकूर, करूण नायर, साई सुदर्शन, अर्शदीप सिंग यांनी संधी मिळाली आहे. तर सर्फराझ खान, श्रेयस अय्यर, हर्षित राणा या खेळाडूंना वगळण्यात आलं आहे.

यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल हे सलामीवीर म्हणून जबाबदारी घेऊ शकतात. साई सुदर्शन आणि करुण नायर यांना मधल्या फळीत स्थान देण्यात आले आहे, जे कोहलीच्या अनुपस्थितीत क्रमांक ४ ची भूमिका बजावू शकतात. ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे आणि तो यष्टीरक्षकाची महत्त्वाची भूमिका बजावेल. ध्रुव जुरेलची दुसरा यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचीही कसोटी संघात निवड झाली आहे. तो पहिल्यांदाच कसोटी संघाचा भाग असणार आहे. याशिवाय, शार्दुल ठाकूरलाही कसोटी संघात पुनरागमन करण्यात यशस्वी झाला आहे. पण या १८ खेळाडूंमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आलेला नाही. सर्फराझ खान देखील या संघाचा भाग नाही. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आकाश दीप सारख्या स्टार वेगवान गोलंदाजांची संघात निवड करण्यात आली आहे.

भारत वि. इंग्लंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक

भारत वि. इंग्लंड – पहिली कसोटी – २० ते २४ जून – दुपारी ३.३० वा.
भारत वि. इंग्लंड – दुसरी कसोटी – २ ते ६ जुलै – दुपारी ३.३० वा.
भारत वि. इंग्लंड – तिसरी कसोटी – १० ते १४ जुलै – दुपारी ३.३० वा.
भारत वि. इंग्लंड – चौथी कसोटी – २३ ते २७ जुलै – दुपारी ३.३० वा.
भारत वि. इंग्लंड – पाचवी कसोटी – ३१ जुलै ते ४ ऑगस्ट – दुपारी ३.३० वा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ

शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिन्यू ईश्वरन, करूण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाशदीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव<br>