भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर असून कसोटी सामना सुरु आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या लढतीत भारताचे खेळाडू कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सामन्यात भारताकडून किशोरवयीन शेफाली वर्माला, इंग्लंडकडून सोफिया डंकले यांना संधी देण्यात आली आहे. पदार्पणातील सामन्यात या दोघींच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. मागच्या वर्षी झालेल्या टी २० विश्वचषकात शेफालीने चांगली कामगिरी केली होती. आता तिच्याकडून कसोटी सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. शेफालीने टी २० विश्वचषकात आक्रमक खेळी करत सर्वाधिक धावा केल्या होत्या.

शेफालीचं वय १७ वर्षे १३९ दिवस इतकं असताना कसोटीत खेळण्याची संधी मिळाली आहे. भारताकडून खेळणारी ती तिसरी युवा महिला खेळाडू आहे. रजनी वेणुगोपाळ १५ वर्षे २८३ दिवसांची असताना, तर सुलक्षणा १७ वर्षे १०४ दिवसांची असताना त्यांना कसोटीत खेळण्याची संधी मिळाली होती.

WTC Final: न्यूझीलंडच्या ६ सदस्यांनी मोडले बायो-बबलचे नियम!; बीसीसीआय करणार आयसीसीकडे तक्रार

शेफाली वर्माने टी २० सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. तिने २२ सामन्यात २९ च्या सरासरीने ६१७ धावा केल्या आहेत. ही धावसंख्या तिने १४८ स्ट्राईकरेटने केली आहे. त्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. ७३ ही तिची सर्वात मोठी धावसंख्या आहे. शेफालीच्या कामगिरीचं मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांनीही कौतुक केलं आहे.

WTC Final: रिकी पॉटिंगचा विक्रम मोडण्याची विराट कोहलीला संधी

दोन्ही संघातील खेळाडू
भारत- स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, पूनम राऊत, मिताली राज, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, तानिया भाटिया, झूलन गोस्वामी, पूजा वस्त्रकार, शिखा पांडे

इंग्लंड- टॅमी ब्यूमोंट, लॉरेन विनफील्ड हिल, हिथर नाइट, नॅट स्किवेर, अमी जोंस, सोफिया डंकले, जॉर्जिया एलव्हीस, कॅथरीन ब्रंट, सोफी एक्सलेटन, आनया श्रुबलोसे, केट क्रॉस