India vs West Indies Day 2 Highlights: भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय संघाने सार्थ ठरवून भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ५ गडी बाद ५१८ धावा करत डाव घोषित केला.
भारतीय संघाकडून शुबमन गिलने दमदार शतक झळकावलं. तर यशस्वी जैस्वालने १७५ धावांची खेळी केली. वेस्टइंडिजने दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत ४ गडी बाद १४० धावा केल्या आहेत. भारताकडून रवींद्र जडेजाने ३ गडी बाद केले आहेत. वेस्टइंडिजचा संघ ३७८ धावांनी पिछाडीवर आहे.
यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं
भारतीय संघाला दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीलाच मोठ धक्का बसला आहे. यशस्वी जैस्वालकडे द्विशतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती. पण तो १७५ धावांवर असाताना धावबाद होऊन माघारी परतला आहे. फटका मारल्यानंतर त्याने लगेच धाव घेतली, पण गिल धावण्यासाठी तयार नव्हता.
भारतीय संघाच्या ४०० धावा पूर्ण
पहिल्या डावातील १०५ षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. भारतीय संघाने ४०० धावांचा पल्ला गाठला आहे. शुबमन गिल ६० धावांवर नाबाद आहे. तर नितीश रेड्डी ४० धावांवर नाबाद आहे.
भारतीय संघाचे ४ फलंदाज तंबूत! नितीश रेड्डीचं अर्धशतक हुकलं
भारतीय संघाला चौथा मोठा धक्का बसला आहे. शुबमन गिल आणि नितीश कुमार रेड्डीची जोडी चांगलीच जमली होती. पण १०९ व्या षटकात नितीश रेड्डी ४३ धावा करत माघारी परतला.
शुबमन गिलकडे शतक झळकावण्याची संधी! लंचपर्यंत भारतीय संघाने किती धावा केल्या?
भारतीय संघाने दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात फलंदाजी करताना २६ षटकात १०९ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वालचे द्विशतक थोडक्यात हुकले. तर शुबमन गिल ७५ आणि ध्रुव जुरेल ७ धावांवर नाबाद आहे. गिलकडे शतक झळकावण्याची संधी आहे. भारतीय संघाने लंच ब्रेकपर्यंत ४ गडी बाद ४२७ धावा केल्या आहेत.
शुबमन गिलचं भारतात पहिलं शतक! टीम इंडिया मजबूत स्थितीत
भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने आपलं शतक पूर्ण केलं आहे. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील १० वे शतक ठरले आहे. तर कर्णधार म्हणून हे त्याचे ५ वे शतक ठरले आहे.
भारतीय संघाने डाव केल घोषित
भारतीय संघाने दुसऱ्या सत्रात डाव घोषित केला आहे. दुसऱ्या सत्रात फलंदाजी करताना गिलने आपलं शतक पूर्ण केलं. तर ध्रुव जुरेलला आपलं अर्धशतक पूर्ण करण्याची संधी होती. पण तो ४३ धावांवर बाद झाल्यानंतर भारतीय संघाने ५ गडी बाद ५१८ धावांवर डाव घोषित केला.
साई सुदर्शनने घेतलेला कॅच पाहून विश्वासच बसणार नाही! वेस्टइंडिजला पहिला मोठा धक्का
वेस्टइंडिजला पहिला मोठा धक्का बसला आहे. जॉन कँपबेल झेलबाद होऊन माघारी परतला आहे. त्याला बाद करण्यासाठी साई सुदर्शनने अविश्वसनीय झेल घेतला.

वेस्टइंडिजला दुसरा मोठा धक्का
वेस्टइंडिजला दुसरा मोठा धक्का बसला आहे. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर तेजनारायण चंद्रपॉल अवघ्या ३४ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे. त्याला बाद करण्यासाठी केएल राहुलने भन्नाट झेल घेतला आहे. वेस्टइंडिजने २ गडी बाद ८७ धावा केल्या आहेत.
वेस्टइंडिजचे ४ प्रमुख फलंदाज तंबूत
वेस्टइंडिजला तिसरा मोठा धक्का बसला आहे. अॅलिक अँथेंज ४१ धावा करत माघारी परतला आहे. कुलदीप यादवने त्याला बाद करत माघारी धाडलं आहे. त्यानंतर रवींद्र जडेजाने चेजला बाद करत वेस्टइंडिजला चौथा मोठा धक्का दिला आहे.