IRE v IND 2023 T20 Series Cricket Update : भारत विरुद्ध आर्यलँड यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका सुरु असून भारताने सलग दोन सामन्यात विजय संपादन करून मालिका खिशात घातली आहे. रविवारी आर्यलॅंड विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताच्या फलंदाजांसह गोलंदाजांनीही अप्रतिम कामगिरी केली. नवख्या खेळाडूंचं योगदानही मोलाचं ठरलं. अशातच आयपीएलमध्ये इतिहास रचलेल्या रिंकू सिंगने टीम इंडियात पदार्पण केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही धमाका केला. कारण आर्यलँड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात रिंकूने धडाकेबाज फलंदाजी करून भारताचा डाव उत्तमरित्या फिनिश केला.

रिंकूने 21 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकार ठोकून 38 धावा कुटल्या. रिंकूच्या या जबदरस्त फलंदाजीबद्दल टीम इंडियाचा माजी विकेटकिपर किरण मोरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रिंकू सिंग भविष्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि दिग्गज खेळाडू युवराज सिंग यांच्यासारखा फिनिशर होऊ शकतो. रिंकूकडे टीम इंडियाचा आक्रमक फिनिशर बनण्याची क्षमता आहे, असं मोरे यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा – भारताने जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली जिंकली पहिली मालिका, दुसऱ्या सामन्यात आयर्लंडवर ३३ धावांनी विजय

माध्यमांशी प्रतिक्रिया देताना मोरे म्हणाले, “रिंकू सिंगला टीम इंडियात संधी मिळावी, असं मला नेहमीच वाटत होतं. ५ व्या किंवा ६ व्या क्रमांकावर तो चांगली फलंदाजी करू शकतो. रिंकूकडे एक आक्रमक फिनिशर म्हणून फलंदाजी करण्याची क्षमता आहे. आपण एम एस धोनी आणि युवराज सिंगची फलंदाजी पाहिली आहे. पण हे दोन्ही दिग्गज खेळाडू निवृत्त झाल्यानंतर आपल्याला त्यांच्यासारखा खेळाडू मिळाला नाहीय. काही खेळाडूंना संधी देण्यात आली. पण त्यांना फिनिशर म्हणून छाप टाकता आली नाही. तिलक वर्माकडेही चांगला फिनिशर बनण्यासाठी कौशल्य आहेत. रिंकू एक चांगला क्षेत्ररक्षकही आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये रिंकूने उल्लेखनीय कामगिरी केल्याचं मी पाहिलं आहे. त्याने त्याच्या क्रिकेटच्या शैलीत खूर सुधारणा केली आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोलकाता नाईट रायडर्ससाठी रिंकू सिंगने १४ इनिंगमध्ये ५९.२५ च्या स्ट्राईक रेटने ४७४ धावा कुटल्या. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून रिंकूने एक आक्रमक फिनिशर असल्याची छाप सोडली. एकाच षटकात ५ षटकार ठोकून कोलकता संघाला विजय मिळवून देणाऱ्या रिंकूने आयपीएलमध्ये इतिहास रचला होता.